Kolhapur News : शेंडापार्कातील २० एकरवर ‘टेक्निकल पार्क’,राजेश क्षीरसागर : शाश्‍वत विकास परिषद जिल्ह्याचा जीडीपी वाढवेल,मुश्रीफ

शेंडा पार्क येथील आयटी पार्कसाठी आरक्षित ३५ एकरांपैकी २० एकर जमीन टेक्निकल पार्कसाठी देण्याची घोषणा आज राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आणि मित्र संघटनेचे उपाध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केली.
Kolhapur News
Kolhapur News sakal
Updated on

कोल्हापूर : शेंडा पार्क येथील आयटी पार्कसाठी आरक्षित ३५ एकरांपैकी २० एकर जमीन टेक्निकल पार्कसाठी देण्याची घोषणा आज राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आणि मित्र संघटनेचे उपाध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी ही माहिती दिल्याचेही क्षीरसागर यांनी येथे जाहीर केले. महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्र) संस्थेतर्फे राज्यातील पहिल्‍या शाश्वत विकास परिषदेच्या उद्‍घाटनप्रसंगी ही घोषणा झाली. अध्यक्षस्थानी पालकमंत्री हसन मुश्रीफ होते.

क्षीरसागर म्हणाले, ‘परिषदेत आयटी, शेती, उद्योग-व्यवसाय, पर्यटन, वस्त्रोद्योग आणि अन्न प्रक्रिया उद्योग या माध्‍यमातून विकास साधण्याचा प्रयत्न होईल. मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच झाले पाहिजे. कोल्हापूर शहराची हद्दवाढ झाली पाहिजे. यातून कोल्हापूरचा शाश्‍वत विकास होणार आहे. पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले की, दूरदृष्टीने कोल्हापूरचा विकास साधणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांच्या नगरीत शाश्वत विकास होत आहे. परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्याच्या जीडीपीत (सकल राष्ट्रीय उत्पादन) वाढ होईल, दरडोई उत्पन्न वाढ होईल. मुंबई, पुणे, ठाणे आणि नागपूर या विकासवाढीच्या शहरात कोल्हापूर शिवाय पर्याय नाही. जागतिक बॅंकेच्या सहकार्यातून महापुराचा धोका कायमचा कमी होईल. पुराचे पाणी मराठवाड्याकडे वळविले जाईल.’

मित्र संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविवीणसिंह परदेशी म्हणाले, ‘महाराष्ट्रात गुंतवणूक दर कमी होत आहे. देशातील ६०० जिल्ह्यांत विकास दर वाढला तर अपोआपच देशाचा विकास दर वाढणार आहे. हा बदल शाश्‍वत विकास परिषदेतून घडवायचा आहे. ’

मित्र संस्थेचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी सुशील खोडवेकर आणि अमन मित्तल, जिल्हाधिकारी अमोल येडगे, प्रशासक के. मंजुलक्ष्मी, जागतिक बँकेचे अधिकारी विजय के., वस्त्रोद्योग आयुक्त पांडा, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन, एस. सहसचिव प्रमोद शिंदे, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललीत गांधी, सत्यजित भोसले, सुरेंद्र जैन आदी उपस्थित होते.

महापूर नियोजन अभ्यासाचा अहवाल लवकरच

जागतिक बॅंकेचे अधिकारी विजय के. म्हणाले, कोल्हापूर,सांगली, इचलकरंजीतील महापुराचे नियोजन अभ्यासाचा अहवाल सहा-आठ महिन्यांत तयार होईल. पाणी जमिनीत मुरविण्यासाठी प्रयत्न होतील. महापुराचे हेच पाणी जमिनीत मुरविण्याचा प्रयत्न केला जाईल. कमी वेळेत अधिक पाऊस पडतो, त्याचेही शास्त्र अभ्यासले जाईल. वातावरण बदलाचा परिणाम अभ्यासला जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.