Kolhapur News : कामगारांच्या देण्यांवरून गदारोळ : गाळप क्षमता वाढविणार

Kolhapur News : कामगारांच्या देण्यांवरून गदारोळ : गाळप क्षमता वाढविणार
Updated on

अप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या (गोडसाखर) सुरवातीला शांततेत चाललेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ब्रिस्क कंपनीकडील रकमेच्या वसुलीचा मुद्दा चर्चेला आला. त्यानंतर सभेपुढील विषय बाजूला पडले आणि ब्रिस्कबाबत उपस्थित केलेले प्रश्नच केंद्रस्थानी आले. निवृत्त कामगारांच्या थकीत देण्यांवरुन गदारोळ झाला. या गदारोळातच गाळप क्षमता वाढविण्यासह इथेनॉल प्रकल्प उभारणीला मंजुरी देण्यात आली. कारखान्याचे अध्यक्ष डॉ. प्रकाश शहापूरकर अध्यक्षस्थानी होते. कारखाना कार्यस्थळावर ही सभा झाली.

डॉ. शहापूरकर यांनी कारखान्याची सर्व कामे ऑक्टोबर अखेरपर्यंत पूर्ण होतील. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात कारखाना चालू करणारच, अशी ग्वाही दिली. कामगारांची थकीत देणी, पगारासाठी कोणतीही बँक एक रुपया देण्यास तयार नाही. त्यामुळे कारखान्याचे उत्पन्न वाढविणे हा एकच मार्ग आहे. त्यासाठी इथेनॉल प्रकल्प उभारणे आवश्यक आहे. दोन वर्षांत सर्व देणी देण्याची खात्री त्यांनी दिली. यावेळी निवृत्त कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवाजी खोत यांनी ब्रिक्स कंपनीकडील रक्कम वसूल करण्यासाठी काय केले याची विचारणा केली. कारखान्याकडील देणी दोन वर्षांनी द्या पण, ब्रिस्ककडील रक्कम वसूल करा आणि आमची देणी द्या, अशी भूमिका मांडली. यानंतर सभेत गदारोळ होण्यास सुरवात झाली.

Kolhapur News : कामगारांच्या देण्यांवरून गदारोळ : गाळप क्षमता वाढविणार
Sharad Pawar : संकटांवर मात करण्यातच समाजहित; शरद पवार यांचे प्रतिपादन

डॉ. शहापूरकर यांनी, ब्रिस्कला तीन-चार वेळा पत्रव्यवहार केला आहे. पण, त्यांच्याकडून उत्तर आले नसल्याचे सांगितले. माजी संचालक अमर चव्हाण यांनी ब्रिस्कचा मालक कोण ते सांगण्याचा आग्रह धरला. मात्र, त्याबाबतचे रेकॉर्ड कारखान्याकडे उपलब्धच नसल्याचे डॉ. शहापूरकर यांनी सांगितले. यावर श्री. खोत यांनी मग कारखाना चालविण्यास दिलाच कसा, असा मुद्दा उपस्थित केला. शासनाच्या नियमाप्रमाणे कारखाना चालविण्यास दिला होता. त्यामुळे कारखाना कोणाला भाड्याने दिला ते शासनालाच विचारा, असे सांगितले. ही सारी चर्चा पुढे जाईल तसा गदारोळ वाढत गेला. यातच डॉ. शहापूरकर यांनी विषय पत्रिकेवरील सर्व विषय मंजूर का, अशी विचारणा केली. यावर सभासदांनी मंजूर... मंजूरची घोषणा दिली.

Kolhapur News : कामगारांच्या देण्यांवरून गदारोळ : गाळप क्षमता वाढविणार
'Nadi ko Jano' अ‍ॅप लॉंच! मिळेल भारतीय नद्यांशी संबंधित माहिती

उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण यांनी स्वागत केले. कार्यकारी संचालक सुधीर पाटील यांनी नोटीस वाचन केले. माजी संचालकांनी कारखान्याला माजी अध्यक्ष अप्पासाहेब नलवडे व काकासाहेब शहापूकर यांचे तैलचित्र भेट दिले. श्री. खोत यांनी सर्व प्रवर्तकांचे तैलचित्र लावण्याची सूचना मांडली. कारखान्याला जिल्हा बँकेकडून आर्थिक सहकार्य केल्याबद्दल वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या आभाराचा ठराव मांडण्यात आला.

ऐनवेळचे ‘ते’ विषय नामंजूर...

अध्यक्ष डॉ. शहापूरकर यांनी मागील सभेचा वृत्तांत वाचून कायम करणे हा विषय मांडला. मागील सभेतील ऐनवेळच्या तीन विषयांना सूचक व अनुमोदक नाहीत. शिवाय त्यावर सभासदांच्या तक्रारीही आल्या आहेत. त्यामुळे ते तीन विषय नामंजूर करण्यात येत असल्याचे जाहीर केले. सभासदांनी घोषणा देत त्यांना प्रतिसाद दिला.

Kolhapur News : कामगारांच्या देण्यांवरून गदारोळ : गाळप क्षमता वाढविणार
Face Care Tips : केळी चेहऱ्याला लावण्याचे आहेत जास्त फायदे, एकदा प्रयोग करून तर पहा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.