कोल्हापूर उत्तर : भाजपकडून सत्यजित कदमांच्या नावावर शिक्कामोर्तब

आज दुपारी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील नाना कदम यांच्या नावाची घोषणा करणार
nana kadam
nana kadamesakal
Updated on
Summary

आज दुपारी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील नाना कदम यांच्या नावाची घोषणा करणार

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीकडून माजी नगरसेवक नाना कदम (Satyajeet nana kadam) यांचे नाव निश्‍चित झाले. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आज कदम यांच्या नावाची अधिकृत घोषणा करणार आहेत. कदम यांच्या नावाचा एबी फॉर्म आल्याची माहिती भाजपमधील (BJP) नेत्यांनी दिली.

nana kadam
शेतकऱ्यांच्या हितासाठी आमदारकीवर पाणी सोडण्यास तयार - शेट्टी

कोल्हापूर उत्तर विधानसभा (Kolhapur North) मतदारसंघातील आमदार चंद्रकांत जाधव (Chanrakant Jadhav) यांचे निधन झाले. त्यामुळे या मतदारसंघात १२ एप्रिलला मतदान निवडणूक होणार आहे. सोमवारी (११) येथे भारतीय जनता पार्टीच्या इच्छुक उमेदवारांची मुलाखत झाली. या मुलाखतीचा अहवाल प्रदेशाच्या कोअर कमिटीकडे पाठविण्यात आला. या अहवालावर मुंबईमध्ये कोल्हापुरातील भाजपचे (BJP) नेते आणि कोरकमिटी सदस्य यांची बैठक झाली. या बैठकीत नाना कदम यांचे नाव निश्चित करून ते सेंट्रल बोर्डकडे पाठवण्यात आले. त्यानंतर दिल्लीमध्ये नाना कदम यांची उमेदवारी निश्चित झाली.

आज प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे आज नाना उर्फ सत्यजित कदम यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा करणार आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या उत्साहाचे वातावरण आहे. भाजपची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर निवडणुकीला वेग आला असून आता काँग्रेस (Congress) उमेदवाराच्या नावाची उत्सुकता आहे. कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीसाठी भाजपाकडून सत्यजित कदम यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे.

nana kadam
'भाजपचा भगवा भेसळयुक्त, अशा नकली रंगांवर केंद्राचीही बंदी'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.