कोल्हापूर : व्हॉटस्ॲप गॅस बुकिंगला विरोध

अन्य पर्याय उपलब्ध असताना सक्ती न करण्याची ग्राहकांतून मागणी
gas booking
gas booking sakal
Updated on

कोल्हापूर : ‘व्हॉटस्‌ॲपवरच घरगुती गॅस सिलिंडरची नोंद करण्याची (बुकिंग) सक्ती केली जात आहे. याच व्हॉटस्‌ॲप नंबरवरून केवळ नोंदणीच नव्हे, तर पैसेही पाठविता येतात. ऑनलाईन व्यवहार होतात. त्यामुळेच घरगुती गॅस सिलिंडर ग्राहकांना ‘डिजिटल’ करण्यासाठी एजन्सीजच्या मालकांना कंपन्यांकडून तगादा लावला जात आहे. ‘टार्गेट’ दिले जात असल्याचे सांगण्यात येत.

gas booking
'ACB'ची कारवाई; आंबेवाडी ग्रामपंचायतीचा शिपाई जाळ्यात

प्रत्यक्षात ही डिजिटल साक्षरता उपयोगाची आहे; पण ती तातडीने होणेही हेही शक्य नसल्याने ग्राहकांना वेठीस धरले जात आहे. विशेष करून अन्य पर्याय उपलब्ध असताना ही सक्ती योग्य नाही, त्यासाठी वेळ द्यावा, अशीही मागणी ग्राहकांतून होत आहे. सध्या ‘आयव्हीआरएस’ अर्थात मोबाइल हॅणडसेटवरून ठराविक क्रमांक डायल केल्यास पुढील सूचना मिळते आणि ठराविक क्रमांक डायल केल्यास बुकिंग होते. तसेच ग्राहक लॅण्डलाईननंबरवर एजन्सीच्या कार्यालयात संपर्क साधून बुकिंग करू शकतो.

तिसरा पर्याय म्हणजे ज्यांचे मोबाईल क्रमांक एजन्सीकडे नोंद नाहीत, असे ग्राहक थेट एजन्सी कार्यालयात जाऊन बुकिंग करतात. या तीनही पद्धती सध्या योग्य पद्धतीने सुरू असल्याचे दिसून येते, तरीही साधरण महिन्याभरापासून कंपन्यांकडून व्हॉटस्‌ ॲपवरील बुकिंग वाढविण्याचा तगादा एजन्सीकडे लावला जात आहे. त्यांना ग्राहकांना डिजिटल साक्षर करण्यासाठी टार्गेट दिले जात आहे. प्रत्यक्षात एजन्सीकडूनही याबाबत प्रयत्न सुरू आहेत. मात्र, काही एजन्सीधारकांकडे ग्रामीण भागातील, झोपडपट्टीतील ग्राहक आहेत.

त्यांच्याकडे स्मार्ट फोन नाही, काहींकडे इंटरनेट आणि व्हॉटसॲप नाही. त्यामुळे त्यांना व्हॉटसॲपद्वारे बुकिंची नोंदणी तातडीने करण्यास सांगणे संयुक्तिक ठरत नाही, अशा ग्राहकांकडूनही त्याला विरोध होत आहे. प्रत्यक्षात तीन पद्धतीने बुकिंगचे काम सुरू असताना कंपन्यांकडून तोंडी आणि अंतर्गत सूचना देऊन ग्राहकांवर व्हॉटस्‌ॲप नोंदणीची सक्ती करू नये. व्हॉटस्‌ॲप बुकिंग हे ऐिच्छक असावे, अशीही ग्राहकांची मागणी आहे.

अशीच मागणी एजन्सी धारकांचीही आहे. डिजिलट साक्षरता महत्त्वाची आहे. मात्र, ती कमी कालावधीत करण्याची सक्ती करून एजन्सीधारकांना आणि ग्राहकांना वेठीस धरू नये, अशी मागणी पुढे येत आहे. याबाबत थेट कंपनीच्या विरोधात नको म्हणून काहींनी याबाबत प्रतिक्रियाही देण्याचे टाळले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()