कोल्हापूर : वीज बिलाचे आकडे बघून अनेक ग्राहकांना धक्का बसू लागला आहे. मात्र, व्यवहाराची सांगड घालणाऱ्या कोल्हापूरसह सांगलीतील आठ हजार ७४० ग्राहकांनी थेट घरावर सौर रूफ टॉप बसवून घेतले आहेत. त्यामुळे त्यांच्या वीज बिलात प्रतिमहिना ५५० रुपयांची बचत होत असून, उर्वरित जास्तीची वीज महावितरणला दिल्यामुळे वीज बिलही शून्यासह मोफत विजेचा लाभ त्यांना मिळत आहे. यात काही गृहनिर्माण संस्था, संकुलांचाही समावेश आहे.
घराच्या छतावर रूफ टॉप सोलर वीज निर्मिती प्रकल्प बसवून सौरऊर्जेचा वापर करून वीजनिर्मिती करायची व ती वीज घरी वापरून विजेची गरज पूर्ण करायची, अशी ही योजना आहे. यात गरजेपेक्षा अधिक वीजनिर्मिती झाल्यास वीज बिल शून्य येते.
अर्थात, वीज मोफत मिळते. त्यासोबत जास्तीची वीज महावितरणला विकून उत्पन्न मिळते. केंद्र सरकारतर्फे यापूर्वी प्रधानमंत्री-सूर्यधर मोफत वीज योजनेत तीन किलोवॅट क्षमतेच्या छतावरील सौरऊर्जा निर्मिती प्रकल्पासाठी प्रत्येक कुटुंबाला ७८ हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे.
त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यात विनाअनुदानित व अनुदानित तत्त्वावर घरगुती व इतर वर्गवारीतील एकूण पाच हजार ७८५ ग्राहकांनी ७८.८५ मेगावॅट क्षमतेची रूफ टॉप सौर यंत्रणा बसविली आहे. सांगली जिल्ह्यात याच पद्धतीने २९९५ ग्राहकांनी ४३.८३ मेगावॅट क्षमतेची रूफ टॉप सौर यंत्रणा बसविली आहेत.
दोन्ही जिल्ह्यांत मिळून एकूण आठ हजार ७४० घरांवर हा प्रकल्पाद्वारे १२२ मेगावॅट क्षमतेची यंत्रणा बसविली आहे. त्याद्वारे या ग्राहकांना वीज बिल शून्य आले असून त्यांनी जास्तीची वीज महावितरणला विकून फायदा मिळवला आहे. महावितरणने या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
वर्षभरात सात ते दहा हजार रुपयांची बचत या सौर रूफ टॉप बसविण्यामुळे झाली आहे. एकदाच पैसे घातल्यानंतर अनेक वर्षे यातून लाभ मिळेल.
- संजय पाटील, उंचगाव, ग्राहक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.