कोल्हापूर : ९० टक्के पेरण्या पूर्ण

नुकसान नाही : पावसाच्या विश्रांतीचा पिकांना फायदा
भात लावणी पूर्ण
भात लावणी पूर्ण sakal
Updated on

कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर पेरण्यांची गती वाढली आहे. भात, तूर, सोयाबीन पेरणी ९० टक्क्यांहून अधिक तर इतर कडधान्यांची पेरणी ८० टक्केपर्यंत झाली आहे. यंदाच्या पावसामुळे शेतीचे नुकसान झाल्याची नोंद अद्याप नाही. दरम्यान, पावसाने दोन दिवसांपासून घेतलेल्या विश्रांतीचा पेरणीसाठी चांगला फायदा होत आहे. आणखी चार ते पाच दिवसांत सर्व पेरण्या पूर्ण होतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार, तर काही ठिकाणी अतिवृष्टी होत आहे. यात खरिपाच्या पेरण्यांनाही अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे. आजअखेर १ लाख ९६ हजार ४६६६ हेक्‍टरपैकी १ लाख ७३ हजार ६१६ हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत केवळ ७० ते ८० हेक्‍टर पेरणी जास्त झाली आहे. जिल्ह्याला लागणारा सर्व खतसाठा शिल्लक आहे.

जिल्ह्यात ७ जूनला मृग नक्षत्राचा मुहूर्त साधत पेरणीला सुरुवात झाली. पावसाने दीर्घकाळ विश्रांती घेतल्यामुळे जी काही पेरणी केली होती. ती वाया जाते की काय, अशी भीती व्यक्त केली जात होती. दरम्यान, जूनअखेरीस पावसाने काही प्रमाणात सुरुवात केली. त्यानंतर मुसळधार आणि अतिवृष्टी होऊ लागल्याने पेरणी केलेल्या पिकांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात ९४ हजार ९६६ पैकी ८६ हजार ९९३ हेक्‍टर भात पेरणी झाली आहे. आतापर्यंत ९१.६ टक्के भात पेरणी झाली आहे. ज्वारी ११४३ पैकी ८८१ हेक्‍टर, नाचणी १७ हजार २६५ पैकी १२ हजार ९१ हेक्‍टर, मका ३५३ पैक ४८९ हेक्‍टर पेरणी झाली आहे. भुईमूग, तीळ, कारळे, सोयाबीन तसेच इतर गळीत धान्यांची ९० टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. दरम्यान, भुईमूग व सोयाबीनची सर्वाधिक पेरणी झाली आहे.

जिल्ह्यात सुमारे ९० टक्के पेरणी झाली आहे. या पिकांना लागणार खतांचा पुरवठाही सुरळीत आहे. खतांचा तुटवडा जाणवू नये यासाठी बफर स्टॉक करून ठेवला आहे.

-जालिंदर पांगारे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.