कोल्हापूर : पोलिस बँड आता नव्या ढंगात

लग्न, समारंभ अशा खासगी कार्यक्रमासाठीच नव्या ड्रेसकोडचा वापर केला जाईल.
police
policesakal
Updated on

कोल्हापूर : एकापेक्षा एक धून सादर करून रसिकांना थक्क करीत कार्यक्रमाची शोभा वाढविणाऱ्या पोलिस बँडचा लूक बदलला आहे. लग्न, समारंभ अशा खासगी कार्यक्रमासाठीच नव्या ड्रेसकोडचा वापर केला जाईल.

लग्न, समारंभात पोलिस बँड हे मुख्य आकर्षण असते. त्यामुळे पोलिस बँडला लग्नसराईत मागणी असते. या वेळी पोलिसी ड्रेसमध्येच त्यांना कला सादर करावी लागत होती. सध्याचा ड्रेसकोड कार्यक्रमाच्या ठिकाणी अडचणीचा होता. तो मळण्याची आणि खराब होण्याची शक्यता असायची. गर्दीच्या ठिकाणी कलाकारांना उकाडाही जास्त जाणवायचा. ही बाब लक्षात घेता खासगी कार्यक्रमांसाठी विशेष असा वेगळा आणि रुबाबदार पोशाख पोलिस बँडसाठी निवडण्यात आला आहे.

खासगी समारंभासाठी पोलिस बँडचा आकर्षक, सोयीस्कर असा ड्रेसकोड देण्याचा प्रयत्न अहमदनगर, मुंबई, सिधुदुर्ग पोलिसांनी केला. कोल्हापूर जिल्हा पोलिस दलानेही बँडचा ड्रेसकोड बदलावा, असा प्रस्ताव पोलिस निरीक्षक सत्यवान माशाळकर यांनी पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याकडे मांडला. त्यानुसार बलकवडे यांच्या पुढाकारातून महिन्यापासून फक्त खासगी कार्यक्रमांसाठी पोलिस बँडला नवा आकर्षक ड्रेसकोड दिला आहे. पांढरा शर्ट, नेव्ही ब्ल्यू पँट, बूट, टाय आणि टोपी असा हा ड्रेसकोड आहे. आकर्षक अशा पेहरावामुळे बँडमधील कलाकारांच्या उत्साहात आणखी भर पडली. अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे, गृह पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बँडपथकाचे काम सुरू आहे.

बँडमधील कलाकार...

उपनिरीक्षक श्रीकांत कोरवी, साहाय्यक फौजदार रमेश जाधव, सिकंदर शेख, हवालदार मोहन इंगळे, जावेद पठाण, सुरेश जाधव, वासीम मुल्ला, योगेश वावरे, महिला पोलिस प्रतिभा पाटील, अश्विनी पाटील, शहाबाज गवंडी, रमीज मुल्ला, प्यारेलाल मुल्ला यांनी पोलिस

बँडची धुरा यशस्वीरीत्या सांभाळली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.