Kolhapur : मुश्रीफ पालकमंत्री होताच भाजप कार्यकर्त्यांची अवस्था 'इकडे आड अन् तिकडे विहीर'; चंद्रकांतदादांचा अपेक्षाभंग?

मुश्रीफ पालकमंत्री (Guardian Minister) झाल्याने भाजप कार्यकर्त्यांची अवस्था ‘इकडे आड आणि तिकडे विहीर’ अशीच झाली आहे.
Chandrakant Patil vs Hasan Mushrif
Chandrakant Patil vs Hasan Mushrifesakal
Updated on
Summary

हिंदुत्ववादी कार्यकर्तेही नाराज झाले असून, यातून भाजप विरोधात नवा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर : ज्या हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांना विरोध केला त्यांच्याकडेच भाजप कार्यकर्त्यांना निधी मागावा लागणार आहे. ‘जिल्हा नियोजन’च्या निधीमध्ये वाटेकरी वाढल्याने विकासकामे कशी होणार, असा प्रश्न भाजप कार्यकर्त्यांसमोर आहे. सत्ता असूनही लाभ मिळत नाही, अशी खंत कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत.

त्यातच मुश्रीफ पालकमंत्री (Guardian Minister) झाल्याने भाजप कार्यकर्त्यांची अवस्था ‘इकडे आड आणि तिकडे विहीर’ अशीच झाली आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) पालकमंत्री होतील, अशी अपेक्षा भाजप कार्यकर्त्यांना होती. मात्र हसन मुश्रीफ पालकमंत्री झाल्याने त्यांच्यात नाराजी आहे.

Chandrakant Patil vs Hasan Mushrif
Ajit Pawar : अजितदादांना आपण चुकलोय हे समजलंय, त्यामुळंच ते नाराज आहेत; काय म्हणाले ठाकरे गटाचे आमदार?

सर्वाधिक जागा निवडून आल्यावरही पहिली अडीच वर्षे भाजपला विरोधात बसावे लागले. त्याचा तोटा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनाही झाला. जिल्ह्यातील महत्त्वाच्या पदांवर राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची, नेत्यांची वर्णी लागली. पूर्वी पाच वर्षे सत्ता असतानाही अपवाद सोडले, तर सत्तेचा लाभ सामान्य कार्यकर्त्याला मिळालाच नव्हता. त्यामुळे नाराजी होतीच, त्यातच सत्ता गेल्याने अपेक्षाभंगच झाला.

Chandrakant Patil vs Hasan Mushrif
HD Devegowda : ..म्हणून 'इंडिया' आघाडीत सामील होण्याचा प्रस्ताव नाकारला अन् भाजपसोबत..; माजी पंतप्रधानांनी सांगितलं 'हे' कारण

अडीच वर्षांनंतर सत्ताबदल होऊन पुन्हा सेना-भाजप सरकार सत्तेवर आले. कार्यकर्त्यांच्या अपेक्षा पल्लवित झाल्या. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गट काही महिन्यांनी सत्तेत सहभागी झाल्याने सत्तेत तिसरा हिस्सेदार आला. याचे पडसाद नियोजन समितीच्या निधीवरून दिसून आले.

हसन मुश्रीफांना मंत्रीपद मिळाल्याने सत्तेपासून दूर गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला जिल्ह्यात पुन्हा उभारी मिळाली. त्यातच हसन मुश्रीफ पालकमंत्री झाले. त्यामुळे ज्या मुश्रीफांविरोधात कायम विरोध, संघर्षाची भूमिका घेतली त्यांच्याकडेच निधीसाठी जावे लागेल. हिंदुत्ववादी कार्यकर्तेही नाराज झाले असून, यातून भाजप विरोधात नवा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.

Chandrakant Patil vs Hasan Mushrif
Loksabha Election : 'तिसऱ्यांदा मोदीच पुन्हा पंतप्रधान, साताऱ्याचा खासदारही भाजपचाच होणार'; बावनकुळेंनी व्यक्त केला विश्वास

कागलकरांची अडचण

राष्ट्रवादी काँग्रेसचा गट सत्तेत सहभागी झाल्यानंतर हसन मुश्रीफ यांना मंत्रिपद मिळाले. त्यामुळे कागलमधील भाजप कार्यकर्ते नाराज झाले. पक्ष सोडण्यापर्यंतच्या घोषणा काहींनी केल्या. मात्र समरजित घाटगे यांनी संयमाची भूमिका घेऊन कार्यकर्त्यांना समजावून सांगत पक्षासोबत राहण्यास राजी केले. मुश्रीफांना पालकमंत्रिपद मिळाल्याने कागलमधील भाजप कार्यकर्ते काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Chandrakant Patil vs Hasan Mushrif
Maharashtra Politics : भाजप देशातला सर्वात मोठा पक्ष, शरद पवार-उद्धव ठाकरे त्यांचा पक्ष शोधताहेत; बावनकुळेंचा टोला

जिल्ह्याची सूत्रे काँग्रेस-राष्ट्रवादीकडेच

राज्यात आणि केंद्रात जरी भारतीय जनता पक्षाचे सरकार असले जिल्ह्याची सर्व सूत्रे काँग्रेस राष्ट्रवादीकडेच आहेत. गोकुळ, जिल्हा मध्यवर्ती बँक व अन्य सहकारी संस्थांवर काँग्रेस -राष्ट्रवादीची पकड आहे. हसन मुश्रीफ पालकमंत्री झाल्यामुळे जिल्ह्याच्या आघाड्यांवर पुन्हा राष्ट्रवादीची पकड मजबूत होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()