Kolhapur : एकमेकांना संपवण्यासाठी इरेला पेटलेले मुन्ना-बंटी पुन्हा एकत्र येणार? महाडिकांच्या 'त्या' वक्तव्याने राजकीय चर्चेला उधाण

आम्ही केलेल्या विकासकामांचे श्रेय दुसऱ्या कुणी घेतले की वाईट वाटते.
Dhananjay Mahadik vs Satej Patil
Dhananjay Mahadik vs Satej Patilesakal
Updated on
Summary

राज्यातील शिवसेनेच्या (शिंदे गट) सर्वच खासदारांना पुन्हा तिकीट दिले जाईल.

कोल्हापूर : ‘आम्ही केलेल्या विकासकामांचे श्रेय दुसऱ्या कुणी घेतले की वाईट वाटते; पण मी श्रेयवादाचे राजकारण करत नाही. शहरात वातानुकूलित बस आल्या, हे चांगलेच आहे. मी शहरात शंभर इलेक्ट्रिक बस आणणार आहे. भविष्यात थेट पाईपलाईन योजना पूर्ण झाल्यावर आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांचे अभिनंदन करू; मात्र आमचे राजकीय मार्ग कायमच वेगळे राहतील,’ असे प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी केले.

विधानसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. खासदार महाडिक (Dhananjay Mahadik) म्हणाले, ‘जिल्ह्यात विकासाचे राजकारण झाले पाहिजे. इथल्या प्रश्नांची सोडवणूक हाोण्यासाठी नेहमीच आम्ही पक्षाच्या माध्यमातून प्रयत्नशील आहोत. कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणाचे काम लवकरच पूर्ण होईल.'

Dhananjay Mahadik vs Satej Patil
सांगलीतील चिंचोलीत गणेशमूर्तीच्या डोळ्यांतून अश्रू; गणपती पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी, अंनिसनं केलं 'हे' आव्हान

आम्ही केलेल्या कामाचे श्रेय काहीवेळा अन्यजण घेतात, याचे वाईट वाटते; पण आम्ही श्रेयवादाचे राजकारण करत नाही. शहरात वातानुकूलित बस आणल्या गेल्या ही चांगली गोष्ट आहे. त्याचे आम्ही स्वागत करतो. भविष्यात थेट पाईपलाईनचे (Pipeline Yojana) काम पूर्ण होईल. त्यावेळी आमदार सतेज पाटील यांचे अभिनंदन करू, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

भाजपमधील अंतर्गत नाराजीबद्दल ते म्हणाले, ‘हे वाद आमच्या कुटुंबातील आहेत. त्यामुळे ते दूर होतील. मी स्वतः गडहिंग्लजमधील कार्यकर्त्यांना भेटून त्यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर सर्वांनी आपापसातले मतभेद दूर करून एकदिलाने काम करण्याची ग्वाही दिली. अशाच प्रकारे आजरा, शिरोळ येथे जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहोत. जुन्या कार्यकर्त्यांमधील नाराज दूर करून आम्ही सर्वजण एकत्र काम करू.’

Dhananjay Mahadik vs Satej Patil
खासदार महाडिकांच्या मध्यस्थीमुळं भाजपमधला 'हा' वाद संपुष्टात; बंद खोलीत नाराज पदाधिकाऱ्यांशी चर्चा, नेमकं काय घडलं?

'दक्षिण’मधून अमल महाडिकच

राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दक्षिण विधानसभा मतदारसंघावर दावा सांगितला आहे, याबद्दल विचारले असता खासदार महाडिक म्हणाले, ‘अमल महाडिक यांनी आमदार असताना देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मोठा निधी आणून दक्षिण विधानसभा मतदारसंघात अनेक विकासकामे केली. आजही त्यांचा जनसंपर्क मोठा आहे. त्यामुळे दक्षिण मतदारसंघातून तेच विधानसभा लढवतील आणि निवडून येतील.’

Dhananjay Mahadik vs Satej Patil
..तोपर्यंत देशात महिला आरक्षण लागू होणार नाही; मोदींवर टीका करत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा मोठा दावा

जिल्ह्यातील दोन्ही खासदार पुन्हा निवडणूक लढवतील

लोकसभा जागांबद्दल महाडिक म्हणाले, ‘राज्यातील शिवसेनेच्या (शिंदे गट) सर्वच खासदारांना पुन्हा तिकीट दिले जाईल. त्यामुळे जिल्ह्यातील दोन्ही खासदार पुन्हा निवडणूक लढवतील. याबाबतचे सर्व निर्णय राज्यातील प्रमुख नेते एकत्रितपणे घेतील.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.