जुन्या पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त करीत जिल्हा पातळीवरील नेत्यांना टार्गेट केले.
आजरा : जिल्ह्यातील नेतेमंडळींनी केलेल्या खांदेपालटावर आजरा तालुक्यात भारतीय जनता पक्षामध्ये (Ajara Kolhapur) जुन्या व नव्या पदाधिकाऱ्यांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. अनेक वर्षांपासून पक्षात सुरु असलेली धुसफूस चव्हाट्यावर आली आहे.
जुन्या पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त करीत जिल्हा पातळीवरील नेत्यांना टार्गेट केले. आजऱ्यातील भाजपचे कार्यालय (BJP office) बंद करण्याचा निर्णय जाहीर केला. जिल्ह्यातील नेतेमंडळींकडून मुस्कटदाबी होत असल्याचा आरोप करीत कार्यालयाचा फलक उतरवला.
यामुळे पक्षात दुफळी पडल्याचे स्पष्ट झाले असून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तालुका पातळीवरील पदाधिकारी बदलासाठी पडद्यामागे जोरदार हालचाली सुरु होत्या. खांदेपालट कसा होणार यावर भाजपमध्ये उलट-सुलट प्रतिक्रिया उमटत होत्या. जिल्ह्यातील वरिष्ठ नेतेमंडळींनी खांदेपालट केली. याचे पडसाद दोन दिवसांत तालुक्यात उमटले आहेत.
याबाबत गुरुवारी (ता. ७) पक्षातील जुन्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेतली व नेतेमंडळींच्या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली. स्थानिक जुन्या जाणत्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांची मते विचारात न घेता बदल केल्याचा आरोप त्यांनी केला. बदलामध्ये जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलल्याचा आरोप करत संताप व्यक्त केला. जुने पदाधिकारी आज आजरा -गडहिंग्लज मार्गावरील भाजपच्या तालुका कार्यालयात जमले.
त्यांनी भाजपच्या कार्यालयाचा नामफलक उतरवला. कार्यालय बंद करण्याचा निर्णय जाहीर केला. लवकरच याबाबत मेळावा घेऊन पुढील दिशा ठरवणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी जाहीर केले. यावेळी प्रा. सुधीर मुंज, अरुण देसाई, नाथा देसाई, सचिन इंदलकर, महेश नार्वेकर, हर्षद परुळेकर भास्कर बुरुड, गुरु टोपले, अभिजित रांगणेकर, संजय सांबरेकर, मारुती गुरव यांच्यासह शहर व तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.