कोल्हापूर : जिल्हातील अनेक निवडणूका (Election) महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) म्हणून लढवल्या पण, जिल्हा बॅंकेत (Kolhapur District Bank Election) मात्र कॉंग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेनेऐवजी भारतीय जनता पक्षाला सोबत घेतले हे दुदैवी आहे. सत्तारूढकडून सोयीचे राजकारण केले जात आहे. शिवसेनेचा केवळ वापर करुन घेतला जात आहे. भाजला सोबत घेतल्यामुळे महाविकास आघाडी राहिली नसल्याने सर्व समविचारी पक्ष एकत्र येवून सत्तारूढ गटाला टक्कर देण्याचा निर्णय घेतला असल्याची इशारा शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर, खासदार संजय मंडलिक व माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी आज दिला. शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठक़ीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
श्री दुधवडकर म्हणाले, जिल्हा बॅंकेची निवडणूक महाविकास आघाडी म्हणून निवडली जाईल,यासाठी आम्ही ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांना आज दुपारपर्यंत वेळ दिली होती. तरीही त्यांना आमचा प्रस्ताव मान्य नाही. त्यांनी भाजपसोबत युती केली आणि शिवसेनेला डावलले आहे. त्यामुळे शिवसेना म्हणून आम्ही सर्व समविचारी पक्ष जिल्हा बॅंकेची निवडणूक ताकदीने लढवणार आहे.
खासदार संजय मंडलिक म्हणाले, जिल्हा बॅंकेत माझ्यासोबत बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर हे प्रक्रिया गटातून जिल्हा बॅंकेत संचालक होतो. पी.जी. शिंदे यांनी जिल्हा बॅंकेचा अनेकवर्ष कारभार केला आहे. शिवसेना प्रणित पॅनेलमध्ये सहकारी सर्व दिग्गिज उमेदवार आहेत. पक्षाच्या पलिकडे जावून वेगवेगळ्या लोकांना उमेदार म्हणून घेतले आहे. बॅंक चांगली चालावी. यामध्ये शिवसेनेचा अधिक भाग असावा, अशीच मागणी होती. त्यांची मागणी मान्य झाली असती तर पॅनेल झाले नसते. महाविकास आघाडी म्हणून आपण अनेक निवडणूका लढलो आहोत. जिल्हा बॅंकेतही महाविकास आघाडी असावी. दुदैवाने कॉंग्रेस-राष्ट्रवादीने भारतीय जनता पक्षाला सोबत घेतले. त्यामुळे महाविकास आघाडी राहिली नाही.
माजी आमदार संपतराव पवार-पाटील म्हणाले, शिवसेनेच्यानिमित्ताने जिल्ह्यातील चांगले संघटन आणि चांगल्या विचारांना ताकद देणारी माणसं मिळत असतील तर त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय झाला आहे. माणसं किती दिली यापेक्षा बॅंकेच्या कारभार भविष्यात कसा चालणार याचा विचार केला जाईल. सर्वसामान्य माणसांकडे बॅंक राखली पाहिजे. ज्याच्या घरात आर्थिक पाठबळ मिळत नाही. त्यांना बळ देण्याचे काम केले पाहिजे.
माजी आमदार चंद्रदीप नरके म्हणाले, जिल्हा बेँकेच्या निवडणूकांनिमित्त कोल्हापूरात झालेल्या सर्व घडमोडींची माहिती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सांगितल्या आहेत. जिल्ह्याच्या राजकारणात आणि संस्थांमध्ये सोयीचे राजकारण केले आहे. आवश्यक ठिकाणी शिवसेनेचा वापर करुन घ्यायचा, एकमेंकांना लढवायचे आणि पुढच्या निवडणूकीत आपला शब्द बदलायचा. या भूमिका सातत्याने केल्या जात आहेत. याला छेद देण्यासाठी जिल्हा बॅंकेत सर्वसामान्य कार्यकर्त्याला निवडूण देण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे, असा सवालही श्री नरके यांनी केला.
प्रा. शहाजी कांबळे म्हणाले, सर्वसामान्य नागरिकांना बॅंकेच्या सर्व सुविधा मिळाल्या पाहिजेत, यासाठी आरपीआयच्यावतीने उमेदवार शाहू पॅनेलमध्ये उतरवला आहे. या निश्चित यश मिळेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.