Gokul Dudh Sangh : 'गोकुळ' अध्यक्षांचा शौमिका महाडिकांवर पलटवार; 'महाडिकांनी फक्त राजकीय हेतूनंच तसं केलंय'

'निवडणुकीत विरोधी आघाडीतून चार संचालक निवडून आले आहेत.'
Arun Dongle vs Shoumika Mahadik
Arun Dongle vs Shoumika Mahadik esakal
Updated on
Summary

संघाच्या संचालिका शौमिका महाडिक (Shoumika Mahadik) यांनी फक्त वैयक्तिक राजकीय हेतूने प्रेरित होऊन संघाच्या चाचणी लेखापरीक्षणाची मागणी केल्यानेच उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

कोल्हापूर : जिल्हा सहकारी दूध उत्पादक (Gokul Dudh Sangh) संघामध्ये कोणताही गैरकारभार झालेला नाही. झालेल्या निवडणुकीत विरोधी आघाडीतून चार संचालक निवडून आले आहेत. त्यापैकी तीन संचालक राजकारण विरहीत, ‘गोकुळ’चे हित पाहून संघाच्या कामकाजात सक्रिय सहभागी असतात. ते कामकाजाबाबत समाधानी आहेत, असं स्पष्ट मत अरुण डोंगळे (Arun Dongle) यांनी व्यक्त केलं.

गोकुळ संघाचे अध्यक्ष डोंगळेंनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटलंय की, ‘शासकीय लेखा परीक्षणाला विरोध नव्हता. परंतु, संघाच्या संचालिका शौमिका महाडिक (Shoumika Mahadik) यांनी फक्त वैयक्तिक राजकीय हेतूने प्रेरित होऊन संघाच्या चाचणी लेखापरीक्षणाची मागणी केल्यानेच उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

Arun Dongle vs Shoumika Mahadik
Gokul Dudh Sangh : उच्च न्यायालयाच्या 'या' निकालानंतर शौमिका महाडिक आक्रमक; गावोगावी जाऊन सांगणार 'ही' माहिती

महाडिक संघाच्या दूध उत्पादकांची दिशाभूल करत आहेत. त्यांनी सर्वात प्रथम आपण विरोधक आहोत या भूमिकेतून बाहेर यावे आणि आपला विरोधाचा दृष्‍टिकोन बदलून ‘गोकुळ''च्या विकासात्मक निर्णय प्रक्रियेत सहभागी व्हावे आणि ‘गोकुळ''च्या प्रगतीसाठी योगदान द्यावे.’

Arun Dongle vs Shoumika Mahadik
NCP Crisis : अजितदादा गटातून कोणी आपल्यात येण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना मागच्या बाकावर बसवा; शरद पवारांचे आदेश

संघाच्या कारभाराचे अवलोकन करून लेखापरीक्षकांनी ‘अ वर्ग’ दिला आहे. आमची बांधिलकी ही दूध उत्पादक शेतकऱ्यांशी असून, त्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला देण्यास कटिबद्ध आहोत. दराचा तुलनात्मक तक्ता तयार करून संचालक मंडळ सभेत उपस्थित टेंडरधारकाशी दराबाबत चर्चा होऊन दर निश्चित केले जातात व ज्यांचा दर कमी असेल त्यांना कामाचा ठेका दिला जातो. ही कार्यप्रणाली पूर्वीप्रमाणेच आजही पारदर्शक पद्धतीने केली जाते.

Arun Dongle vs Shoumika Mahadik
'स्वाभिमानी'च्या राजू शेट्टींचं ठरलं! INDIA आघाडीत सहभागासाठी नाना पटोलेंचा थेट फोन; शेट्टी म्हणाले, आम्ही त्यांच्यात..

‘लम्पी आजार प्रतिबंधित उपाययोजना आखण्यात गोकुळ दूध संघाने कुठेही हलगर्जीपणा केला नाही. सरकारच्या पशुसंवर्धन विभागाच्या बरोबरीने गोकुळने दूध उत्पादकांना व शेतकऱ्यांना सुविधा पुरविल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन उपाययोजनासंबंधी चर्चा केली. शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून निवेदन दिले. त्यानुसार तत्काळ कार्यवाही होऊन आर्थिक मदत देणेबाबत शासन आदेश काढण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.