सत्ताधाऱ्यांना लक्ष करणाऱ्या सतेज पाटलांना मुश्रीफांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, 'तुम्ही पालकमंत्री होता तेंव्हा..'

सतेज पाटील अडीच वर्षे पालकमंत्री होते. त्यावेळी त्यांनी विरोधकांना किती निधी दिला?
Hasan Mushrif Satej Patil
Hasan Mushrif Satej Patilesakal
Updated on
Summary

'राज्यात महाविकास आघाडीची सत्ता अडीच वर्षे होती. याकाळात आमदार सतेज पाटील जिल्ह्याचे पालकमंत्री होते.'

कोल्हापूर : ‘सतेज पाटील अडीच वर्षे पालकमंत्री होते. त्यावेळी त्यांनी विरोधकांना किती निधी दिला?,’ असा खोचक प्रश्न पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी विचारून सतेज पाटील यांना प्रत्युत्तर दिले. लोकसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी शंभर टक्के निधी खर्च होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

आमदार सतेज पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपावरून सत्ताधाऱ्यांना लक्ष केले होते. काँग्रेसच्या (Congress) आमदारांना निधी मिळत नाही. केवळ भाजप, सेना आणि राष्ट्रवादीलाच निधी मिळतो. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीचे नाव सत्ताधारी निधी वितरणी समिती असे करा, असा टोला त्यांनी अप्रत्यक्षपणे मुश्रीफांना लगावला होता.

Hasan Mushrif Satej Patil
NCP Crisis : भविष्यात राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार? दिलीप वळसे-पाटलांचं 'साहेब-दादां'बाबत परखड भाष्य

याबाबत मुश्रीफांना विचारले असता ते म्हणाले, ‘राज्यात महाविकास आघाडीची सत्ता अडीच वर्षे होती. याकाळात आमदार सतेज पाटील जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यावेळी त्यांनी विरोधकांना किती निधी दिला होता? जिल्हा नियोजन समितीचा निधी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी शंभर टक्के निधी खर्ची पडेल.

सोमवारी (ता. ८) बैठक होणार आहे. यामध्ये विविध कामांना प्रशासकिय मान्यता देण्यात येईल. त्यानंतर फेब्रुवारीपर्यंत निविदा काढून वर्क ऑर्डर दिली जाईल. त्यानंतर मार्चपर्यंत म्हणजे लोकसभा निवडणुकीपूर्वी सर्व कामे सुरु होतील. विविध शासकिय समित्यांवर नियुक्तीसाठी महायुतीच्या तिन्ही पक्षांकडून नावे देण्याचे काम सुरु आहे. हे काम पूर्ण झाल्यावर लवकरच समित्या गठीत केल्या जातील.

Hasan Mushrif Satej Patil
जयंत पाटील, प्रतीक पाटील की सुमनताई? 'या' मतदारसंघांतून कोणाला मिळणार उमेदवारी? कार्यकर्त्यांच्या मागणीने चर्चांना उधाण

आमचाही पक्ष एक नंबर

खासदार संजय राऊत यांनी शिवसेना हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष होईल असे म्हटले आहे. याबाबत विचारले असता मुश्रीफ म्हणाले, ‘प्रत्येकाला आपला पक्ष वाढण्याचा अधिकार आहे. आम्हीही राष्ट्रवादी काँग्रेस राज्यातील क्रमांक एकचा पक्ष होईल असे म्हणणार.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.