राष्ट्रवादीच्या वाट्याला विधानसभेच्या फक्त दोनच जागा? 'या' जागेवरून मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता, पक्षातून पुन्हा बंडखोरी?

Kolhapur Marathi News: राधानगरी-भुदरगड विधानसभेच्या जागेवरून पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.
Kolhapur Politics NCP
Kolhapur Politics NCPesakal
Updated on
Summary

महायुतीत लढायचे झाल्यास राष्ट्रवादीला कागल व चंदगड अशा दोनच मतदारसंघांवर हक्क सांगता येणार आहे.

कोल्हापूर : आगामी लोकसभेसह विधानसभेची निवडणूक (Loksabha Election) राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत महायुतीत लढणार या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्या म्हणण्यानुसार लोकसभेला जिल्ह्यातील राष्ट्रवादीला महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करावा लागेल तर विधानसभेला दोनच जागा वाट्याला येतील.

Kolhapur Politics NCP
Kolhapur Politics : 'दक्षिणे'त सुरू झालं 'उत्तरायण'; पाटील विरुद्ध महाडिक लढतीत आता शिवसेनेच्या क्षीरसागरांची उडी?

राधानगरी-भुदरगड विधानसभेच्या जागेवरून पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत (ता. १०) उत्तरदायित्व सभा झाली. या सभेसाठी आलेल्या श्री. तटकरे यांनी सभेपूर्वी माध्यमांशी संवाद साधताना राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीतून लढेल असे जाहीर केले होते.

महायुतीतूनच जागा वाटप होईल, असेही ते म्हणाले. त्यामुळे लोकसभेला सद्यस्थितीत राष्ट्रवादीकडे उमेदवारच नाही, तशीच स्थिती भाजपचीही आहे. जिल्ह्यातील दोन्ही खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेला पाठिंबा दिल्याने या दोन्ही जागा त्यांच्या वाट्याला गेल्यास राष्ट्रवादीला त्यांचा प्रचार करण्याशिवाय पर्याय नाही.

Kolhapur Politics NCP
Pusesawali Riots : अल्पसंख्याकांची घरं जाळणारा पुसेसावळी दंगलीचा मास्टरमाईंड कोण? पोलिसांसमोर मोठं आव्हान

एकेकाळी जिल्ह्याचे दोन्ही खासदार आणि चार आमदार राष्ट्रवादीचे असलेल्या पक्षाला या महायुतीत या जागा मागण्याचाही अधिकार रहणार नाही. जिल्ह्यात विधानसभेचे दहा मतदारसंघ आहेत. यापैकी चार मतदारसंघात काँग्रेसचे आमदार आहेत.

उर्वरित सहापैकी दोन मतदारसंघात राष्ट्रवादीचे, एका मतदारसंघात शिंदे गटाचे प्रकाश आबिटकर, शिरोळचे राजेंद्र पाटील-यड्रावकर असे दोन तर शाहूवाडीच्या डॉ. विनय कोरे व इचलरंजीतून अपक्ष आलेल्या प्रकाश आवाडे यांनी यापूर्वीच भाजपला पाठिंबा दिला आहे.

Kolhapur Politics NCP
Pusesawali Riots : पुसेसावळीत दंगल उसळताच उदयनराजेंनी मध्यरात्री दिली घटनास्थळी भेटी; केलं महत्त्वपूर्ण आवाहन

त्यामुळे महायुतीत लढायचे झाल्यास राष्ट्रवादीला कागल व चंदगड अशा दोनच मतदारसंघांवर हक्क सांगता येणार आहे. राधानगरीतील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील व माजी आमदार के. पी. पाटील यांनीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ धरली आहे.

त्यामुळे या दोघांपैकी एकाला मतदारसंघ मिळवायचा झाल्यास शिंदे गटाचे आबिटकर यांच्या उमेदवारीचे काय? आबिटकर हे विद्यमान आमदार असल्याने त्यांना डावलून राष्ट्रवादीला ही जागा सोडताना मोठा पेच शक्य आहे. त्यातून बंडखोरीची शक्यता अधिक आहे.

मुश्रीफांनी ताकद दाखवली

या सभेच्या निमित्ताने वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपली जिल्ह्यातील ताकद दाखवली. त्यांच्या प्रयत्नातून व नेटक्या नियोजनातून काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पडलेल्या उत्तरदायित्व सभेने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना उर्जा मिळाली आहे.

सभेला मोठी गर्दी जमवण्यात मुश्रीफ यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांना यश आले आहे. आता हेच वातावरण टिकवून ठेवणे त्यांच्यासमोरचे आव्हान असेल.

Kolhapur Politics NCP
Machindragad : मच्छिंद्रगडावरील 'तो' शिलालेख संभाजी महाराजांच्या काळातील; इतिहासाची साक्ष देणारा ठेवा सापडला, काय आहे खासियत?

शहर विकासाला चालना मिळण्याची आशा

अर्थमंत्री असलेल्या अजित पवार यांनी शहर विकासाचा अजेंडाच कालच्या सभेत मांडला. मुश्रीफ यांनी आयटी पार्कसह जोतिबा मंदिर, अंबाबाई मंदिर आराखडा मंजूर करावा, हद्दवाढ करावी, उच्च न्यायालयाचे खंडपीठ, काळम्मावाडी धरणासाठी निधी देण्याची मागणी केली.

पवार यांनी विद्यापीठाचा उर्वरित निधी देण्याबरोबरच अन्य मागण्यांनाही निधी देण्याची घोषणा केल्याने शहर विकासाला चालना मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.