Kolhapur Politics : जिल्हा भाजपमध्ये जुना-नवा वाद आला ऐरणीवर

आजरा, गडहिंग्लजसह शिरोळ तालुक्यातील जुन्या कार्यकर्त्यांत नियुक्‍त्‍यांवरून नाराजी
bjp
bjpsakal
Updated on

कोल्हापूर - भारतीय जनता पक्षात पुन्हा एकदा जुना-नवा वाद ऐरणीवर आला आहे. जिल्हा नियोजन समिती, विविध शासकीय समित्या यामध्ये जुन्या कार्यकर्त्यांना डावलण्यात आले असल्याची खंत व्यक्त होत आहे. नुकत्याच झालेल्या संघटनात्मक नियुक्त्यांमध्येही जुन्या कार्यकर्त्यांना संधी न मिळाल्याने त्यांनी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली.

आजरा, गडहिंग्लज आणि शिरोळ तालुक्यात याचा उद्रेक झाला. मात्र, जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांत सापत्न वागणूक मिळत असल्याची खंत दिसून येते. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून भाजपसाठी ही धोक्याची घंटा ठरण्याची शक्यता आहे.

भारतीय जनता पक्षाला २०१४ नंतर जिल्ह्यात खऱ्या अर्थाने ‘अच्छे दिन’ आले. जिल्हा परिषदेत भाजप सत्तेत सहभागी झाला. त्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षातून अनेक मातब्बर नेते आपला गट घेऊन भारतीय जनता पक्षात आले. त्यामुळे पक्षाचा विस्तारही झाला आणि कार्यकर्तेही वाढले. यातच जुने आणि नवे असा नवा वाद सुरू झाला.

bjp
Kolhapur News : अन् शेतमजुरांचा घडला विमान प्रवास, टाकळीच्या शेतकऱ्याचा स्वखर्चातून उपक्रम

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर धनंजय महाडिक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पुढे ते राज्यसभेचे खासदार झाले. त्यानंतर काही दिवसांतच राज्यात सत्ताबदल होऊन पुन्हा भारतीय जनता पक्षाचे सरकार राज्यात आले. त्यानंतर अजित पवार गटही सत्तेत सहभागी झाल्याने सत्ताधारी पक्षाची ताकद आणखी वाढली. असे जरी असले तरी गेल्या काही महिन्यांपासून पक्षात जुने आणि नवे असा मोठा वाद सुरू आहे.

bjp
Chh. Sambhaji Nagar : जिल्ह्यातील १२८ शाळांवर टांगती तलवार

याची सुरुवात नियोजन समितीमध्ये सदस्य म्हणून ज्यांना घेण्यात आले त्यामध्ये भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांना डावलण्यात आले. त्यानंतर ज्या शासकीय समित्यांवरील नियुक्त्या झाल्या, त्यामध्ये जुन्या कार्यकर्त्यांना संधी दिली गेली नाही. त्यानंतर भाजपच्या संघटनात्मक नियुक्त्या झाल्या. यामध्येही जुन्या कार्यकर्त्यांना डावलण्यात आले. ५० टक्के जुने आणि ५० टक्के नवे कार्यकर्ते असा समन्वय ठेवून संघटनात्मक बांधणी करण्याचे निश्चित झाले होते. मात्र, येथेही जुन्या कार्यकर्त्यांना बाजूला ठेवण्यात आले. संघटनेतील बहुतांशी निर्णायक पदे नव्याने पक्षात आलेल्यांना देण्यात आली. त्यामुळेच आजरा, गडहिंग्लज पाठोपाठ आता शिरोळमध्येही कार्यकर्त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.

त्या’ पत्राचीही चर्चा

गडहिंग्लज तालुक्यातील एक जुना कार्यकर्ता तेथील भाजपमधील नव्याने आलेल्या गटाच्या विरोधात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उभारला. त्यावेळी त्या गटाने हे भाजपचे नाहीत, त्यांना मतदान करू नये, असे पत्रकच काढले. त्यामुळे इतकी वर्षे पक्षाचे काम केल्यानंतरही ही वागणूक मिळाल्याने जुने कार्यकर्ते नाराज झाले आहेत.

bjp
Kolhapur : आंबेडकरनगरात भाजप सरचिटणीसाच्या घरावर जमावाचा लोखंडी रॉडने हल्ला; सहा संशयितांविरोधात गुन्हा दाखल

पक्षात आला अध्यक्ष झाला

पूर्वी भाजपमध्ये असणारा एक कार्यकर्ता राष्ट्रवादीमध्ये गेला. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी भाजपमध्ये आला. त्यालाच तालुका अध्यक्ष केल्याने कार्यकर्ते नाराज झाले आहेत. निष्ठावान कार्यकर्त्यांना संधी न मिळाल्याने कार्यकर्त्यांत नाराजी वाढत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.