कोल्हापुरात सतेज पाटील यांनी थेट पाईपलाईनसाठी चांगला पाठपुरावा केला. मात्र, काही तरी चांगलं करत असेल तर ते सध्या चालत नाही, अशी परिस्थिती आहे.
कोल्हापूर : ‘कोल्हापूरमध्ये चांगला दवाखाना आणणाऱ्या दिग्विजय खानविलकर (Digvijay Khanvilkar) यांना आमदार सतेज पाटील यांनी पराभूत केले. तर, आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी थेट पाईपलाईन मंजूर केली, त्याचवेळी त्यांना पराभव पत्करावा लागला. यावरून कोल्हापुरात चांगलं चालत नाही की काय, अशी परिस्थिती आहे. तरीही, सतेज पाटील सातत्याने काम करत असल्याचे मत आमदार पी. एन. पाटील (P. N. Patil) यांनी येथे व्यक्त केले.
येथील तपोवन मैदानावर सुरू असलेल्या ‘सतेज कृषी प्रदर्शन २०२३’ची आज सांगता झाली. या वेळी ते बोलत होते. पी. एन. पाटील म्हणाले, ‘तरुणांनी शेतीकडे वळले पाहिजे. यासाठी त्यांना एकरी जास्त उत्पन्न कसे मिळवता येईल, याचे धडे दिले पाहिजेत. कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून हाच हेतू ठेवून तरुणांना मार्गदर्शन केले पाहिजे.
परदेशात शेती कशी होते, त्यासाठी कोणते उपाय केले जातात, याची माहिती देऊन उत्पन्न वाढीसह चांगली मिळकत होईल, असे कृषी ज्ञान देणे महत्त्वाचे आहे. कोल्हापुरात सतेज पाटील यांनी थेट पाईपलाईनसाठी चांगला पाठपुरावा केला. मात्र, काही तरी चांगलं करत असेल तर ते सध्या चालत नाही, अशी परिस्थिती आहे. तरीही नेटाने आणि जोमाने काम करावे लागते.’
आमदार सतेज पाटील म्हणाले, ‘गेल्या तीन दिवसांत धान्य महोत्सवामध्ये सेंद्रिय गूळ साडेतीन टन, इंद्रायणी तांदूळ ५ टन ७०० किलो, आजरा घनसाळ १२ टन, सेंद्रिय हळद १ टन ६०० किलो, जोंधळा जिरगा तांदूळ एक टन, नाचणी दीड टन आणि विविध बी-बियाणे ६०० किलो विक्री झाले आहेत. शेतकऱ्यांचे उत्पादन थेट ग्राहकांपर्यंत पोचला आहे.’ या वेळी आमदार जयंत आसगावकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बजरंग पाटील, डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त तेजस पाटील, कृषी महाविद्यालयाचे डॉ. पिसाळ, ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष विश्वास पाटील व संचालक उपस्थित होते.
माजी आमदार संजय घाटगे म्हणाले, ‘सतेज पाटील यांनी भरवलेले कृषी प्रदर्शन निश्चितपणे चांगले आहे. याचा कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांना चांगला फायदा झाला आहे. आमदार पी. एन. पाटील हे माझ्यामागे सावलीप्रमाणे असतात. आज आपण जे काही आहे त्यामध्ये पाटील यांचा मोलाचा वाटा आहे.’ तर आमदार सतेज पाटील यांचा अनुभव गरम-गार असाच असल्याचे त्यांनी सांगताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.