Kolhapur Politics : 'दक्षिणे'त सुरू झालं 'उत्तरायण'; पाटील विरुद्ध महाडिक लढतीत आता शिवसेनेच्या क्षीरसागरांची उडी?

क्षीरसागर यांचा मतदारसंघ भाजपच्या वाटणीला येण्याची शक्यता आहे.
Kolhapur politics South North Assembly Constituency
Kolhapur politics South North Assembly Constituencyesakal
Updated on
Summary

खासदार धनंजय महाडिक यांनी एका कार्यक्रमात बोलताना ‘कोल्हापूर दक्षिण’चे आमदार अमल महाडिकच असतील, असा विश्‍वास व्यक्त केला आहे.

कोल्हापूर : राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे प्रतिष्ठेच्या कोल्हापूर ‘दक्षिण’ विधानसभा मतदारसंघात आता ‘उत्तरायण’ दिसू लागले आहे. आमदार सतेज पाटील (Satej Patil) ते आमदार ऋतुराज पाटील (Ruturaj Patil) व्हाया माजी आमदार अमल महाडिक असे या मतदारसंघाचे नेतृत्व राहिले आहे.

Kolhapur politics South North Assembly Constituency
Maratha Reservation : मराठ्यांना सरसकट आरक्षण दिल्यास कायदेशीर अडचणी येऊ शकतात? बैठकीत अधिकाऱ्यांनी मांडली मतं

याच मतदारसंघावर आता कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार, राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांची नजर पडली आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या उत्तर विधानसभा मतदारसंघात आता कॉंग्रेसचे नेतृत्व आहे.

त्या मतदारसंघावर भाजपचा डोळा असल्यामुळे क्षीरसागर यांना ‘दक्षिणोत्तर’ नजर फिरवावी लागत आहे. राज्यातील मोजक्या मतदारसंघातील लढती चर्चेच्या ठरतात. यापैकी दक्षिण मतदारसंघ एक आहे. याच मतदारसंघात यापूर्वी माजी मंत्री, खासदार, आमदारांनी एकमेकांविरोधात शड्डू ठोकला होता. त्यामुळे हा मतदारसंघ दीर्घकालीन चर्चेत राहिला.

Kolhapur politics South North Assembly Constituency
Maratha Reservation : आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला सर्व सोयी-सुविधा देणार; मंत्री शंभूराज देसाईंची घोषणा

आमदार ऋतुराज पाटील हे ‘उत्तर’मधून लढणार अशी हवा करून ते ‘दक्षिण’ मध्ये फिरले. तेथून विजयीही झाले. पुढे महाविकास आघाडी झाली आणि कट्टर शिवसैनिक असलेले क्षीरसागर यांना पोटनिवडणुकीत उत्तरमध्ये कॉंग्रेसच्या जयश्री जाधव यांचा प्रचार करावा लागला. त्यामुळे उत्तर मतदारसंघही आता त्यांचा राहिलेला नाही.

Kolhapur politics South North Assembly Constituency
Kolhapur NCP Sabha : तपोवन मैदानावर धडाडणार अजितदादांची तोफ; कोल्हापुरात रेकॉर्ड ब्रेक सभेचं आयोजन, कधी होणार सभा?

राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांमुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फूट पडली. त्याचे पडसाद आता दक्षिण आणि उत्तरमध्ये दिसू लागले. ‘उत्तर’साठी नेहमीच शड्डू ठोकून आखाड्यात उतरण्याच्या तयारीत असलेल्या क्षीरसागर यांचा मतदारसंघ भाजपच्या वाटणीला येण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे येथे त्यांचा उमेदवार यापूर्वी होता. त्यामुळे क्षीरसागर यांनी महापालिका हद्दीतील पण ‘दक्षिण’ मध्ये असलेल्या प्रभागात अधिक निधी दिला आहे. आपला प्रभाव तेथे दाखवायला सुरुवात केली आहे. प्रसंगी ‘दक्षिण’ मधून शिंदे गटाकडून निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. याचवेळी ‘उत्तर’ ही हातून निसटू नये म्हणून आता ‘दक्षिणोत्तर’ असा प्रवास सुरू केला आहे.

Kolhapur politics South North Assembly Constituency
भाजपचं टेन्शन वाढवणारी बातमी! राज्यात 'ऑपरेशन हस्त'ला वेग, बड्या नेत्याची पडद्यामागं रणनीती, BJP आमदार फुटणार?

खासदार महाडिक यांचे सूचक वक्तव्य

खासदार धनंजय महाडिक यांनी एका कार्यक्रमात बोलताना ‘कोल्हापूर दक्षिण’चे आमदार अमल महाडिकच असतील, असा विश्‍वास व्यक्त केला आहे. त्यामुळे ‘दक्षिणे’त आता ‘उत्तरायण’ सुरू झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()