Kolhapur : पुण्‍यातील कसब्यात ‘कोल्हापूर उत्तर’ची पुनरावृत्ती

चिंचवड विधानसभा मतदारसंघात सहानुभूती निर्णायक ठरल्‍याचे निकालातून स्‍पष्‍ट
 kasba assembly constituency
kasba assembly constituencysakal
Updated on

कोल्हापूर : सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन एक दिलाने लढल्यास भाजपचा पराभव होऊ शकतो, या कोल्हापूर उत्तरच्या निकालाची पुनरावृत्ती पुण्यातील कसबा मतदारसंघात झाली, तर सहानुभूतीची लाट आणि राहुल कलाटे यांची बंडखोरी चिंचवडमध्ये भाजपच्या अश्‍विनी जगताप यांच्या पथ्यावर पडली. या दोन्ही विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी पुण्यात झाली तरी त्याची उत्सुकता मात्र कोल्हापुरात होती.

कोल्हापूर उत्तरचे तत्कालीन आमदार कै. चंद्रकांत जाधव यांच्या निधनाने ही जागा रिक्त झाली होती. त्यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी श्रीमती जयश्री जाधव यांची निवड बिनविरोध करावी म्हणून प्रयत्न केले.

त्यासाठी जिल्हा व राज्य पातळीवरील दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चाही केली. पण, भाजप नेत्यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली नाही.

उलट श्रीमती जाधव यांना भाजपची उमेदवारी देतो, त्यांना बिनविरोध करा असा चुकीचा प्रस्ताव आघाडीसमोर ठेवला. तो मान्य झाला नाही आणि त्यातून ही निवडणूक लागली. त्यावेळी राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेचे मिळून महाविकास आघाडीचे सरकार होते. काँग्रेसने श्रीमती जाधव यांना, तर भाजपने

सत्यजित कदम यांना रिंगणात उतरले. काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील, राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ, त्यावेळी शिवसेनेत असलेले राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यासह इतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ताकद लावली आणि श्रीमती जाधव यांचा विजय सुकर झाला. पुण्याच्या कसबा मतदार संघानेही याचीच पुनरावृत्ती करत सर्वजण एकत्र आलो आणि प्रामाणिकपणे लढलो तर भाजपचा पराभव होऊ शकतो, हा संदेशही यानिमित्ताने दिला गेला.

चिंचवडच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा पराभव शिवसेनेचे बंडखोर राहुल कलाटे यांच्यामुळे झाला, पण या मतदारसंघात सहानुभूतीची लाट ही श्रीमती जगताप यांच्या बाजूने राहिली. दिवंगत लक्ष्मण जगताप हे पूर्वी राष्ट्रवादीचे आमदार होते, त्याचाही फायदा श्रीमती जगताप यांना झाला. श्री. कलाटे यांची बंडखोरी रोखण्यात यश आले असते तर या मतदारसंघाचाही निकाल वेगळा लागला असता, असे श्री. कलाटे यांना पडलेल्या मतांवर स्पष्ट होते.

मंत्री चंद्रकांत पाटील यांना धक्का

भाजपमध्ये चिंचवडची जबाबदारी स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर होती, तर कसबा मतदारसंघाची सूत्रे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पक्षाने सोपवली होती. यात श्री. फडणवीस यांनी बाजी मारली असली तरी श्री. पाटील यांना मात्र कसबा मतदारसंघात धक्का बसला. दिवंगत मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील उमेदवार रिंगणात नसणे हेही या मतदारसंघातील भाजपच्या पराभवाचे एक कारण असू शकते. रवींद्र धंगेकर हे कार्यकर्ता म्हणून चांगला असल्याचे निकालातून दिसून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.