RAin News: आठवडाभर गगनबावडा तालुक्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरु आहे. बुधवारी दुपारनंतर अतिमुसळधार पावसाने झोडपले. घाट माथ्यावर सर्वाधिक पाऊस पडला. कुंभी नदीच्या पुराने सलग चौथ्या दिवशी कळे-गगनबावडा या प्रमुख मार्गावरील वाहतूक ठप्प राहिली.
बुधवारी सकाळी किंचितसा कमी झालेला पावसाचा जोर दुपारनंतर आणखी वाढला. घाटमाथ्यावर जोराचा पाऊस झाला. गगनबावडा, बोरबेट, वेसरफ, कोदे, बावेली इत्यादी ठिकाणी जोराचा पाऊस झाला. दिवसभर जोरात वारे वाहत होते. बुधवारी दिवसभर किरवे-लोंघे दरम्यानच्या रस्त्यावर पुराचे पाणी राहिले
. परिणामी सलग चौथ्या दिवशी कळे-गगनबावडा मार्गावरील वाहतूक बंद राहिली. तालुक्यात 3 ठिकाणी झालेल्या पडझडीत 48 हजारांचे नुकसान झाले. वादळी वा-यामुळे कोल्हापूर गगनबावडा मार्गावरील साळवण येथील झाड उन्मळून पडले. कातळी-तळये दरम्यान मोठे झाड उन्मळून पडले. विजेचे दोन खांब मोडले. गगनबावडा जवळील पेट्रोल पंपाजवळील विजेचा खांब पडला. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी कसरत करत सायंकाळी विद्युत पुरवठा पूर्ववत सुरू केला.
कुंभी, धामणी, सरस्वती व रुपणी नद्या अद्यापही पात्राबाहेर असून कुंभी नदीवरील मांडुकली, शेणवडे, वेतवडे हे बंधारे अद्यापही पाण्याखाली आहेत.दुपारनंतर झालेल्या जोरदार पावसामुळे धामणी नदीवरील सर्वच बंधारे पाण्याखाली गेले होते. गगनबावड्यात गेल्या चोवीस तासांत 136 मिलीमिटर, कोदे धरणक्षेत्रात 137 मिलीमिटर तर कुंभी धरणक्षेत्रात 63 मिलीमिटर पावसाची नोंद झाली. कुंभी धरण क्षमतेच्या 71 टक्के भरले आहे.
Kolhapur Rain Update
गगनबावडा-बोरबेट ते धुंदवडे ही महावितरणची लाईन जंगलातून जाते. जोराचा वारा व मुसळधार पावसामुळे झाडे पडणे, पोल कोसळणे हे दररोज सुरु आहे. मात्र गगनबावडा महावितरणचे कर्मचारी भर पावसातही दुरुस्ती करुन दुर्गम भागातील गावांना विजसेवा देण्याचा प्रयत्न सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.