श्रावणातील ऊन-पावसाचा खेळ थांबला आणि दोन दिवसांपासून पावसाने संततधार सुरू केली. शहर आणि परिसरात दिवसभर पावसाचा जोर राहिला.
कोल्हापूर : वेधशाळेने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार घाटमाथ्यावर गेल्या ४८ तासांत धुवाधार पाऊस झाला. जिल्ह्यात २४ तासांत ३२.९ मिमी पाऊस पडला. यामध्ये राधानगरी तालुक्यात अतिवृष्टी झाली व २४ तासांत ८०.२ मिमी पावसाची नोंद झाली.