Latest Maharashtra News : काळम्मावाडी धरण क्षेत्रामध्ये गेल्या २४ तासांत ११५ मिलिमीटर इतका पाऊस झाल्याने या धरणाचे वक्राकार दरवाजे आणखी १० सेंटीमीटरने उचलावे लागले. काल २५ सेंटीमीटर उघडलेले हे दरवाजे आज ३५ सेंटीमीटरपर्यंत आणखी उचलल्याने २००० क्युसेकने विसर्गात वाढ झाली आहे.
दरवाजातून ४००० आणि पायथ्याच्या वीजगृहातून १००० असा ५००० क्युसेकने विसर्ग दूधगंगा नदीपात्रात सुरू आहे. दरम्यान, राधानगरी धरण क्षेत्रात मात्र पावसाचा जोर किंचित कमी झाल्याने पाणी पातळी स्थिर आहे. अद्याप दोन स्वयंचलीत दरवाजे खुलेच आहेत.