Kolhapur Rain : पश्चिम भागात पावसाचा जोर; कोल्हापुरातील राजाराम बंधारा चौथ्यांदा पाण्याखाली, मोठी धरणंही भरण्याची शक्यता

या पावसामुळे भात आणि उसाला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
Rajaram Bandhara Kolhapur
Rajaram Bandhara Kolhapuresakal
Updated on
Summary

पुढील काही दिवसांत मोठी धरणेही पूर्ण क्षमतेने भरतील, असा अंदाज आहे.

कोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्चिमेकडील ग्रामीण भागात पावसाचा जोर चांगला होता. धरणक्षेत्रातही पाऊस झाल्याने नदीची पाणी पातळी वाढली. पर्यायाने यंदाच्या पावसाळ्यात कसबा बावड्यातील राजाराम बंधारा (Rajaram Bandhara Kolhapur) चौथ्यांदा पाण्याखाली गेला.

Rajaram Bandhara Kolhapur
Konkan Ganeshotsav : 'त्या' सोनेरी दिवसांच्या उरल्या फक्त आठवणी! आताच्या झगमगाटातही 'तिलारी'च्या स्मृती तेजस्वी

शहरात मात्र पावसाचा जोर जेमतेमच होता. दुपारी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. पावसाळ्याच्या मध्यावरच पावसाने दडी मारल्याने शेतकरी हवालदिल झाला. यंदा श्रावणसरीही यथातथाच बरसल्या. त्यामुळे भात, ऊस या पिकांच्या वाढीवर परिणाम होऊ लागला. मात्र गेल्या दोन दिवसांत पावसाने काही प्रमाणात जोर धरला आहे.

Rajaram Bandhara Kolhapur
सांगलीतील चिंचोलीत गणेशमूर्तीच्या डोळ्यांतून अश्रू; गणपती पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी, अंनिसनं केलं 'हे' आव्हान

जिल्ह्यातील पश्चिमेकडील तालुक्यांमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. या पावसामुळे भात आणि उसाला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील धरणसाठा पर्याप्त भरला असून पुढील काही दिवसांत मोठी धरणेही पूर्ण क्षमतेने भरतील, असा अंदाज आहे. शहरात मात्र पावसाने पाठ फिरवली असून किरकोळ सरींचा अपवाद वगळता सप्टेंबर महिना कोरडाच गेल्याची स्थिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.