Rangana Fort : सर्वत्र दमदार पाऊस, ना खायला अन्न ना प्यायला पाणी; रांगणा किल्ल्यावर रात्रभर अडकले 16 पर्यटक

रांगणा किल्ल्यावर (Rangana fort) वर्षा पर्यटनासाठी गेलेले पर्यटक रात्रभर अडकले होते.
Kolhapur rain update Tourists Rangana fort
Kolhapur rain update Tourists Rangana fortesakal
Updated on
Summary

पावसाच्या उघडझापामुळं पर्यटक पाटगाव परिसरातील नयनरम्य निसर्ग व शिवडाव-नाईकवाडी, नितवडे-खेडगे, तोरस्करवाडी येथील धबधबे तसेच रांगणा किल्ल्यावर पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात जात आहेत.

गारगोटी : भुदरगड तालुक्यातील (Bhudargad Taluka) रांगणा किल्ल्यावर (Rangana fort) वर्षा पर्यटनासाठी गेलेले पर्यटक रात्रभर अडकले होते. मात्र स्थानिक नागरिक, पोलीस, आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने पंधरा ते सोळा पर्यटकांची बुधवारी पहाटे सुटका करण्यात आली.

भुदरगड तालुक्यात वर्षा पर्यटनाला चांगलाच बहर आला आहे. पावसाच्या उघडझापामुळं पर्यटक पाटगाव परिसरातील नयनरम्य निसर्ग व शिवडाव-नाईकवाडी, नितवडे-खेडगे, तोरस्करवाडी येथील धबधबे तसेच रांगणा किल्ल्यावर पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात जात आहेत.

Kolhapur rain update Tourists Rangana fort
Ratnagiri Rain Update : महाबळेश्‍वरच्या पावसामुळं 'जगबुडी'नं गाठली इशारा पातळी; किनारपट्टी भागात समुद्रही खवळला

मात्र, दोन दिवस या परिसरात दमदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे नदी नाल्यातून जोरदार पाणी प्रवाह सुरू झाला आहे. मंगळवारी रांगणा पर्यटनासाठी कोल्हापुरातील गेलेले पंधरा ते सोळा पर्यटक भटवाडी चिक्केवाडीच्या ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे रात्रभर अन्न पाण्याविना अडकले होते.

तांब्याचीवाडीचे पोलीस पाटील, अंतुर्लीचे पोलीस पाटील व स्थानिक नागरिक, पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के, सहायक पोलीस निरीक्षक अमित देशमुख, आपत्ती व्यवस्थापन पथकाने बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास सुटका केली. यासाठी दोरचा वापर केला होता.

Kolhapur rain update Tourists Rangana fort
Chiplun Flood Update : चिपळूणात पूरस्थिती; उपमुख्यमंत्री अजित पवारांचा थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन, दिले 'हे' स्पष्ट आदेश

स्वतः ची काळजी घ्या

पाटगाव परिसरात अतिवृष्टी सुरू आहे. नदी-नाल्यांच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली आहे. पर्यटकांनी अनोळखी ठिकाणी पर्यटनास जाताना त्या परिसराची, पावसाची माहिती घ्यावी. नदीनाले पार करून नये स्वत:ची काळजी घ्यावी. जीव धोक्यात घालून पर्यटनासाठी जाऊ नये.

-राजेंद्र मस्के पोलीस निरीक्षक, भुदरगड

Kolhapur rain update Tourists Rangana fort
Thane Rain Update : उल्हास, काळू नदीच्या पाणी पात्रात मोठी वाढ; 'या' नदीनं गाठली धोका पातळी, गावांना सतर्कतेचा इशारा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.