Kolhapur Flood : कोल्हापुरात पूरसदृश परिस्थिती; 59 बंधारे पाण्याखाली, आज-उद्या Yellow Alert

जिल्ह्यात आज (ता. २१) व शनिवारी (ता. २२) यलो, तर रविवारी (ता. २३) आणि सोमवारी (ता. २४) ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे.
Kolhapur Rain Update
Kolhapur Rain Updateesakal
Updated on
Summary

संततधार पावसामुळं पंचगंगा नदीच्या पाणी पातळीतही मोठी वाढ झाल्यामुळं कोल्हापुरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

कोल्हापूर : जिल्ह्यात बुधवारच्या तुलनेत काल दिवसभर पावसाची (Kolhapur Rain Update) तीव्रता कमी राहिली; मात्र, धरणांच्या आणि नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत राहिली. जिल्ह्यात आज (ता. २१) व शनिवारी (ता. २२) यलो, तर रविवारी (ता. २३) आणि सोमवारी (ता. २४) ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे.

कसबा बावडा येथील राजाराम बंधारा येथे पंचगंगा नदीची (Panchganga River) पाणी पातळी ३४.२ फुटांवर गेली, तर ५९ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. दरम्यान, संततधार पावसामुळं पंचगंगा नदीच्या पाणी पातळीतही मोठी वाढ झाल्यामुळं कोल्हापुरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

Kolhapur Rain Update
Kolhapur : आईचा टाहो, थिजलेला बाप अन् हादरलेलं शहर; आईसमोरच बसखाली सापडून पोटचा गोळा ठार

राधानगरी धरणात (Radhanagari Dam) एकूण क्षमता ८.३५ पैकी ५.२३ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरणातून १२०० क्युसेक विसर्ग सुरू आहे. जांबरे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून सांडव्यातून विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाने चांगली हजेरी लावली आहे. त्यामुळे धरणांमधील पाणीसाठा वाढत आहे.

Kolhapur Rain Update
Irshalwadi Landslide : दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत; CM शिंदेंची मोठी घोषणा

राधानगरीसह काळम्मावाडी धरणातही समाधानकारक साठा झाला आहे. दोन दिवसांपूर्वी केवळ ४.५५ टीएमसी असणारा पाणीसाठा आज आठ टीएमसीपर्यंत वाढला आहे. शिरोळ, हातकणंगले तालुक्यातही चांगला पाऊस झाला आहे. याचा फायदा घेत शेतकऱ्यांनी उशिरा का असेना, सोयाबीन, भुईमूग व भाताची पेरणी केली आहे.

Kolhapur rain update
Kolhapur rain updateesakal

पाण्याखाली गेलेले महत्त्वाचे बंधारे

  • पंचगंगा : शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ. भोगावती नदीवरील : हळदी, सरकारी कोगे, राशिवडे व खडक कोगे.

  • कासारी : वालोली, यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे, बाजारभोगाव, पेंडाखळे, करंजफेण व कांटे.

  • हिरण्यकेशी - साळगाव, सुळेरान, चांदेवाडी, दाभीळ, ऐनापूर व निलजी.

  • घटप्रभा - पिळणी, बिजूर-भोगोली, हिंडगाव, कानर्डे-सावर्डे व अडकूर

  • वेदगंगा - निळपण, वाघापूर, कुरणी, बस्तवडे, म्हसवे, गारगोटी, सुरुपली व चिखली.

  • कुंभी : कळे, शेनवडे, वेतवडे व मांडूकली

  • वारणा - चिंचोली, माणगाव, तांदूळवाडी व कोडोली

  • कडवी - भोसलेवाडी, कोपार्डे, शिरगाव, सवते सावर्डे व सरुड पाटणे

  • धामणी : सुळे आणि तुळशी : बीड

Kolhapur Rain Update
Chiplun Rain : वाशिष्ठी नदीच्या नव्या पुलाचा भराव गेला वाहून; मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीवर होणार परिणाम?

राधानगरी धरण ६६ टक्के भरले

राधानगरी : तालुक्यात पावसाचा जोर कायम असून, आज तिसऱ्या दिवशीही अतीवृष्टीची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस तुळशी धरण क्षेत्रावर १२८ मिलीमिटर नोंदला आहे. पाणी पातळी वाढ असल्याने राधानगरी धरणातून वीज निर्मितीसाठी सध्या १२०० क्यूसेक पाणी भोगावती नदीपत्रात सुरू आहे. हे धरण ६६ टक्के भरले आहे. येथे आज सकाळी आठ ते सायंकाळी चार पर्यतच्या आठ तासातच १०० मिलीमिटर पाऊस झाला.

सकाळी आठ पर्यंतच्या २४ तासात तालुक्यातील तुळशी धरण क्षेत्रावर १२८ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. यामुळे हे धरण १.१७ टीएमसी म्हणजे ३४ टक्के भरले आहे. राधानगरी धरणावर १०७ मिलिमीटर पाऊस झाला असून हे धरण आज सायंकाळी ५.५२ टीएमसी म्हणजे ६६ टक्के भरले आहे.

काळम्मावाडी धरण स्थळावर ६८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. हे धरण ८ टीएमसी म्हणजे ३१.४७ टक्के भरले आहे. चार वाजेपर्यंत आठ तासात ४५ मिलीमिटर पाऊस झाला. राधानगरी धरणात पाणलोट क्षेत्रातून चार हजार क्यूसेकची आवक असून, वीज निर्मितीसाठी १२०० क्यूसेक विसर्ग सुरू आहे. आजही पावसाचा जोर कायम असून धरण क्षेत्रात अतिवृष्टी सुरूच आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.