कोल्हापूर : कौतुक सोहळ्यात कर्मचाऱ्यांवरच आसूड

कर्मचारी मेळावा; अध्यक्षांकडे तक्रार करीत निषेध
कौतुक सोहळ्यात कर्मचाऱ्यांवरच आसूड
कौतुक सोहळ्यात कर्मचाऱ्यांवरच आसूडsakal
Updated on

कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती बँकेने गेल्या काही वर्षात केलेल्या प्रगतीत कर्मचाऱ्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे कौतुक करण्यासाठी बोलवलेल्या मेळाव्यात याच कर्मचाऱ्यांवर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने व प्रशासनाधिकारी जी. एम. शिंदे यांनी आसूड ओढले. बँकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ मेळाव्यातून निघून गेल्यानंतर दोघांनीही कर्मचाऱ्यांप्रती खालच्या पातळीवर जाऊन केलेल्या टिकेचा बँक एम्प्लॉईज युनियनने तीव्र निषेध केला असून संबंधित अधिकाऱ्यांना समज देण्याची मागणी केली आहे.

बँकेच्या प्रगतीचा आढावा आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक करण्यासाठी ३० ऑक्टोबरला सुटीदिवशी कर्मचाऱ्यांचा मेळावा शाहू सांस्कृतिक हॉलमध्ये घेतला. त्यादिवशी सुटी आणि त्यानंतर लगेच दिवाळी असल्याने अनेक कर्मचारी तासभर मेळावा चालेल आणि त्यानंतर खरेदीला जायचे म्हणून कुटुंबासह आले होते; पण दुपारी बारा वाजता सुरू झालेला मेळावा सायंकाळी सातपर्यंत चालू होता. दरम्यानच्या मुदतीत कर्मचाऱ्यांना नैसर्गिक विधीसाठीही बाहेर सोडले नाही, हे कमी की काय म्हणून सभागृहाला बाहेरून कडी घालून परस्पर निघून जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना कारवाईची धमकी दिली.

कौतुक सोहळ्यात कर्मचाऱ्यांवरच आसूड
मुंबई : कांदिवलीतील हंसा हेरिटेज बिल्डिंगला आग; महापौर घटनास्थळी

एक सामोसा आणि एका चहावर हे कर्मचारी दिवसभर बसून होते. या प्रकाराचाही युनियने आपल्या पत्रकात निषेध केला आहे. याच मेळाव्यात श्री. शिंदे यांनी बँकेचे कर्मचारी म्हणून ‘बैलगाडीखालून चालणारा प्राणी’ असा उल्लेख केला तर डॉ. माने यांनी कर्मचाऱ्यांना ताळेबंदही नीट करता येत नाही, असा आरोप केला. विमा कंपनीच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत या दोघांनी ही मुक्ताफळे उधळल्याने कर्मचाऱ्यांत तीव्र संतापाची भावना पसरली. या दोन अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांवर तोंडसुख घेऊन आपले अज्ञान प्रकट करण्याचा केविलवाणा प्रयत्न केल्याचा आरोपही या पत्रकात केला आहे. प्रशासकीय कारकिर्दीत याच कर्मचाऱ्यांनी थकबाकीदारांच्या दारात जाऊन आंदोलन करून कर्जाची वसुली केली. त्यामुळेच बँकेची प्रगती झाली असून अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांबद्दल अपशब्द वापरून त्यांचा अपमान करणे याचा आम्ही निषेध करत असल्याचे युनियने पत्रकात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.