Kolhapur : साताऱ्याच्या पिता-पुत्राची जोतिबा डोंगराची सायकलवारी

दुसऱ्या दिवशी त्यांनी परतीचा प्रवास केला. त्यांच्या सायकलवर पर्यावरणपूरक प्रदूषणमुक्त जोतिबा दर्शन व स्वच्छ व सुंदर जोतिबा हा संदेश देणारे फलक होते. सचिन निकम, उंब्रज सायकल ग्रुप , संदीप जाधव वारणा ऊद्योग समूह व जोतिबा ग्रामस्थ, पुजारी यांचे सहकार्य लाभले.
Kolhapur
Kolhapursakal
Updated on

जोतिबा डोंगर - पर्यावरणपूरक व प्रदूषणमुक्त जोतिबा दर्शन भाविक भक्तांनी घ्यावे व स्वच्छ व सुंदर जोतिबा हा संदेश देण्यासाठी पाडळी (जि. सातारा) येथील पिता-पुत्रांनी १८७ कि.मी. पर्यावरणपूरक श्री जोतिबा सायकलवारी पूर्ण केली.

भूषण भिमराव ढाणे (वय ३९) व त्यांचा मुलगा देवराज (वय १० ) अशी त्यांची नांवे आहेत. ढाणे पिता-पूत्र सायकलींग करतात. त्यांनी पंढरपूर शिर्डी या तिर्थ क्षेत्रांना सायकली वरून भेटी दिल्या आहेत . त्यांचे जोतिबा हे कुलदैवत आहे. त्यांच्या गावची पहिल्या क्रमांकाची मानाची सासनकाठी प्रसिद्ध आहे. त्यांनी आपल्या कुलदैवतापर्यंत पर्यावरणपूरक सायकल वारी करण्याचा संकल्प केला.

Kolhapur
Mumbai Crime : 'त्या' पती-पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू; दोघेही झाले होते, गंभीर जखमी

दरम्यान, या पितापूत्रांनी पाडळी- उंब्रज जोतिबा डोंगर असा सात तास सायकल प्रवास केला.

त्यांनी सकाळी नऊ वाजता सायकलीवरून प्रवास सुरू केला. ते महामार्गवरून टोप मार्गे जोतिबा डोंगरावर सांयकाळी आले. त्यांचे ग्रामस्थ पुजारी भाविक यांनी स्वागत केले. जोतिबा दर्शन घेऊन त्यांनी वारणानगर येथे मुक्काम केला.

Kolhapur
Mumbai : खोणी जवळील नदीपात्रात असे काय घडले ? नदी पात्रावर मृत माशांचा खच...

दुसऱ्या दिवशी त्यांनी परतीचा प्रवास केला. त्यांच्या सायकलवर पर्यावरणपूरक प्रदूषणमुक्त जोतिबा दर्शन व स्वच्छ व सुंदर जोतिबा हा संदेश देणारे फलक होते. सचिन निकम, उंब्रज सायकल ग्रुप , संदीप जाधव वारणा ऊद्योग समूह व जोतिबा ग्रामस्थ, पुजारी यांचे सहकार्य लाभले.

जोतिबा डोंगरावर येणाऱ्या भाविकांनी एकदा तरी सायकलीवरून दर्शनासाठी यावे. वेळ काढून भक्ती व शक्तीचा संगम जूळवावा. सायकलीवरून येण्यात मोठा आनंद आहे. त्याने आपल्या अरोग्याचा सुद्धा व्यायाम होतो . पर्यावरणपूरक व प्रदूषण मुक्त दर्शनासाठी सायकलीवरून डोंगरावर या.

-भूषण ढाणे, पाडळी, जि. सातारा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()