कोल्हापूर : शाहू स्मारक भवनचे नूतनीकरण केव्‍हा ?

विश्रामगृह चार वर्षे बंदच; भरीव निधीची अपेक्षा
शाहू स्मारक भवन
शाहू स्मारक भवनsakal
Updated on

कोल्हापूर: राजर्षी शाहू कृतज्ञता पर्वच्या निमित्ताने दसरा चौकातील राजर्षी शाहू स्मारक भवनाचे नूतनीकरण होण्याची आवश्‍यकता आहे. येथील विश्रामगृह चार वर्षांहून अधिक काळ बंद आहे. तेथे बांधकामाच्या दुरुस्तीसाठी मोठा खर्च असल्यामुळे सध्या ते बंद आहे. ‘कमर्शिअल’ म्हणून त्याचा वापर होत असतानाही ते बंद झाले आहे. तसेच शाहू स्मारक भवनाचीही डागडुजी महत्त्वाची आहे.

प्रत्येक वर्षी राजर्षी शाहू स्मारक भवनमध्येच शाहू जयंती निमित्त ‘शाहू’ पुरस्कारांचे वितरण होते. येथे अनेक मान्यवर या निमित्ताने येतात. नेहमीच काही ना काही कार्यक्रम होतात. आर्ट गॅलरी आणि मिनी हॉलला सुद्धा चांगली मागणी आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात आणि प्रशस्त पार्किंग व्यवस्था असल्यामुळे याला मागणीही अधिक आहे. आजही शनिवार आणि रविवार, तसेच अन्य सुट्यांच्या दिवशीही त्याचे बुकिंग फुल्ल असते. शाहू स्मारक भवनमध्ये येणाऱ्या पाहुण्यांची तेथेच राहण्याची व्यवस्था व्हावी, सांस्कृतिक कार्यक्रमानिमित्ताने येणाऱ्या कलाकारांना तेथेच राहता यावे, यासाठी १२ सूट आहेत. ते चालविणे शाहू स्मारक भवनच्या व्यवस्थापनाला शक्य नसल्यामुळे ते खासगी ठेकेदाराला देण्याचा निर्णय झाला. त्यानुसार ठेकेदारालाही देण्यात आले. मात्र, त्याची दुरवस्था मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे चार-पाच वर्षे ते बंदच आहे. दुरुस्ती झाल्यास त्यातून पुन्हा उत्पन्न मिळेल. मात्र, यासाठी आवश्‍यक निधी शाहू स्मारक व्यवस्थापन समितीकडे नाही.

खर्च किती येईल याची चाचपणी

शाहू स्मारकच्या विश्रामगृहात एकूण १२ सूट आहेत. पैकी ९ वातानुकूलीत आहेत. उर्वरित ३ विना वातानुकूलीत आहेत. येथे विश्रामगृहाच्या कार्यालयासाठीही जागा आहे. याच शाहू स्मारक भवनमध्ये कार्यक्रमानिमित्ताने आमदार, खासदार, मंत्री येतात. त्यांनी जिल्हा नियोजन समितीतून किंवा अन्य ठिकाणातून आवश्‍यक निधी दिला, तर बंद पडलेले विश्रामगृह पुन्हा सुरू होईल. दुरुस्तीसाठी किती खर्च होईल, याची माहिती समितीकडून घेतली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.