Shravana Spacial - पांडव अज्ञातवासात असताना त्यांनी येथे वास्तव्य केल्याचे व त्यांनी येथे तपस्या केल्याचे म्हटले जाते. तसेच एका रात्रीत तपस्या शिवमंदिर उभारल्याचीही अख्यायिका सांगितली जाते. या ठिकाणास निलगिरी पर्वत मानले जाते. कारण श्रीकृष्णांनी जे सुदर्शन सोडले ते चक्रेश्वरवाडीत थांबले म्हणून गावाचे नाव चक्रेश्वरवाडी पडले, असेही सांगितले जाते.
दरवर्षीचा सोहळा महाराष्ट्रातून चक्रेश्वरवाडी येथील शिवलिंग दर्शनासाठी हजारो भाविक येतात. तसेच प्रत्येक सोमवारी पालखी सोहळा असतो. शिवाय महाशिवरात्री, नवरात्राच्या कालावधीत येथे यात्रा भरते.
कसे जाल
कोल्हापूर ते गारगोटी मार्गे शेळेवाडी ते ठिकपुर्ली मार्गे चक्रेश्वरवाडी.
एकूण अंतर :३७ किलोमीटर हे व्हायला हवे
‘तपसा’ या ठिकाणी विजेची सुविधा करायला हवी
शिव मंदिर परिसरात पार्किंग व्यवस्था करावी
शिव मंदिर परिसरातील शिल्पांची जपणूक व्हावी
टेकडीवरील अधिष्ठानापर्यंत चांगला रस्ता व्हावा.
कोल्हापूरच्या दक्षिणेला असलेले चक्रेश्वरवाडीचे महादेव मंदिर शैव सांप्रदायाशी संबंधित असून आठव्या व नवव्या शतकात हे मंदिर बांधल्याचे दाखले आहेत. मंदिर परिसरातील शिलालेख आणि त्यानंतर इसवी सन पूर्व काळातील शिल्परचना. पुरातत्त्वीय वैभव असलेले ठिकाण म्हणून चक्रेश्वरवाडीची ओळख आहे.
श्रावण महिन्यात येथे दर्शनासाठी मोठी गर्दी असते. जसजसे या परिसराबाबत संशोधन सुरू झाले तसतसे तेथील प्राचीन माहितीचा खजिना बाहेर पडू लागला आणि मग पुरातत्त्व विभागानेही त्याची नोंद घेतली.
चक्रेश्वरवाडीपासून एक किलोमीटरवर असलेल्या तपसा नावाच्या गुहेचे मूळ नाव तपस्थान. येथे विशिष्ट प्रकारच्या यक्षांची व योगिनींची शिल्पे गुहेत कोरलेली पाहायला मिळतात. तपस्थानात दोन हजार वर्षांपूर्वी शिवाची उपासना होत होती. त्याच ठिकाणी पुरावे पहायला मिळतात.
भारतामध्ये मोजक्या सहा ठिकाणी असलेल्या मुखलिंग प्रकारचे शिवलिंग ही चक्रेश्वरवाडी येथे पहायला मिळते. करवीर नगरी उपासनेचा आणि चक्रेश्वरवाडीशी असलेला संबंध म्हणजे प्रति करवीर नगरी म्हणूनही उल्लेख केला जातो. करवीर निवासिनी अंबाबाई, रंकभैरव, कुबेर, महाकाली, महासरस्वती, योगिनी पट्ट, मातृका पट्ट, अशी करवीर नगरीतील अनेक शिल्पं चक्रेश्वरवाडीत आढळतात.
करवीर क्षेत्रातील देवतांची प्रतिमूर्ती बाराव्या शतकामधील चक्रेश्वरवाडीत स्थापित केली आहेत. याचाच अर्थ एक हजार वर्षांपूर्वीपासून करवीर क्षेत्रातील उपासना व चक्रेश्वरवाडीची उपासना ही एकमेकांशी जोडली गेली आहे.
खगोलशास्त्रीय महत्त्व
चक्रेश्वरवाडीच्या अगदी जवळ आणि पूर्वेला एक टेकडी आहे. ती टेकडी म्हणजे भारतातील खगोलशास्त्रीय अभ्यासासाठी निसर्गाने तयार केलेले एक वरदानच आहे. तेथून पस्तीस किलोमीटर त्रिजेचे आकाश एकाच ठिकाणाहून पाहता येते आणि हे महाराष्ट्रातील एकमेव ठिकाण म्हणून ओळखले जाते. देशातील अनेक खगोलशास्त्रज्ञांनी येथे येऊन निरीक्षणे नोंदवली आहेत.
हे आहे महत्त्व दक्षिण भारतातील अनेक साधक तपस्या या ठिकाणी तपस्येसाठी येतात.
इसवी सन पूर्व काळातील अश्मयुगीन अवशेषांच्या तपासणीचे ठिकाण.
दुसऱ्या शतकातील लोप पावलेल्या शैव सांप्रदायातील उपासनेचे ठिकाण.
आठव्या-नवव्या शतकातील करवीर निवासिनी अंबाबाईसह अनेक मूर्ती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.