Kolhapur : गट-तट ठरवणार जिल्‍ह्याचे राजकारण

गटाच्या सदस्यांचे वर्चस्‍व; जिल्‍हा परिषदेने घालून दिले उदाहरण
politics
politicssakal media
Updated on

कोल्‍हापूर : राष्‍ट्रीय आणि राज्याच्या राजकारणात गटा-तटाचे प्राबल्य आहे. छोट्या-मोठ्या घटक पक्षांना आणि अपक्षांना सोबत घेतल्याशिवाय सत्ता मिळत नाही, हे वास्‍तव आहे. अशाच पद्धतीने जिल्‍ह्याच्या राजकारणातही गटातटांचे आणि अपक्षांचे महत्त्व वाढले आहे. जिल्‍हा परिषदेचे राजकारण हे त्याचे ठसठशीत उदाहरण आहे. सध्या विधान परिषद निवडणुकीच्या निमित्तानेही गटातटांचे महत्त्व पुन्‍हा अधोरेखित झाले आहे. जिल्‍ह्याच्या आगामी राजकारणावर या गटांचा प्रभाव राहिल्यास नवल वाटण्याचे कारण नाही. त्यामुळे पुढील काळात जिल्‍हा परिषद, पंचायत समिती असो की महापालिका, नगरपालिका या ठिकाणी राष्‍ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांपेक्षा गटांकडे उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

politics
मुंबईत गर्भपाताच्या प्रमाणात घसरण; तीन वर्षात ३४ टक्के घट

विधान परिषद निवडणुकीत पालकमंत्री सतेज पाटील विरुद्ध माजी आमदार अमल महाडिक या दोघांनीही पुरेशा संख्याबळाचा दावा केला आहे. मात्र पक्षाच्या मतदारांवरच निवडून येईल, अशी दोन्‍हीकडेही स्‍थिती नाही. निवडून येण्यासाठी जिल्‍ह्यातील जे छोटे-मोठे गट आहेत, त्यांची मदत अपरिहार्य आहे. ती मिळवण्यासाठी नेते आणि उमेदवार रात्रीचा दिवस करत आहेत. जिल्‍हा परिषदेत नावालाच राष्‍ट्रीय पक्षांची सत्ता असून गटातटांनीच सत्तेवर ताबा मिळवला आहे. ही सत्ता मिळवताना जे बार्गेनिंग केले, तीच पद्धत विधान परिषद निवडणुकीतील पाठिंब्यासाठी वापरली जात आहे. अनेक गटातटानी सोईची भूमिका घेत पाठिंब्याचे पत्ते राखीव ठेवले आहेत. नेत्यांकडून आणि उमेदवाराकडून सोईचा शब्‍द घेऊनच पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे. आगामी काळात निवडणुकांमध्ये पक्षांकडे उमेदवारी मागण्यापेक्षा इच्‍छुकांकडून गटांनाच प्राधान्य दिले जाईल, अशी सध्यातरी स्‍थिती आहे.

जिल्‍हा परिषदेतील गटांचे प्राबल्य

  • चंद्रदीप नरके गट - तीन सदस्य; दोन सदस्यांना पदे

  • विनय कोरे गट : सहा सदस्य; दोन सदस्यांना संधी.

  • शेतकरी संघटना : दोन सदस्य. दोघांनाही सभापतिपद

  • प्रकाश आवाडे गट : दोन सदस्य. एका सदस्याला सभापतिपद

  • डॉ. सुजित मिणचेकर गट १ सदस्य -पदाची संधी

  • उल्‍हास पाटील गट १ सदस्य - पदाची संधी

  • सत्यजित पाटील सरुडकर गट - दोन सदस्य पैकी एकाला संधी

  • आमदार प्रकाश आबीटकर गट २ सदस्य - एकास संधी

  • प्रा. खासदार मंडलिक गट - एक सदस्य -पदावर संधी

  • भाजप - सदस्य १४- एका पदावर समाधान.

  • काँग्रेस- १४ - एका पदावर समाधान.

  • राष्‍ट्रवादी सदस्य ११ - एका पदावर समाधान.

politics
केजरीवालांचा बनवाट व्हिडीओ केला शेअर; संबित पात्रांवर कारवाईचे हायकोर्टाचे आदेश

या गटांचे राहणार प्राबल्य

लोकसभा, विधानसभा वगळता जिल्‍ह्यातील सहकारी संस्‍था असो की स्‍थानिक स्‍वराज्य संस्‍थांच्या निवडणुका, यात गटातटांचे प्राबल्य अधिकच वाढण्याची शक्यता आहे. जिल्‍हा परिषदेच्या निवडणुकीतील वरील चित्र बरेच बोलके आहे. याचबरोबर नुकत्याच झालेल्या गोकुळच्या निवडणुकीतही गटातटांनी उपद्रवमूल्य दाखवून दिले आहे. जिल्‍हा बँकेतही अशीच स्‍थिती राहणार आहे. यामध्ये राजकीय पक्षांबरोबरच मंडलिक, कोरे, आवाडे, आबीटकर, चराटी, नरके, गडहिंग्‍लजचे शिंदे या गटांचा दबदबा कायम राहणार आहे. त्यांना वगळून जिल्‍ह्याचे राजकारण करणे कोणत्याही राजकीय पक्षांना परवडणारे नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()