Mr. Gay India Contest : कोल्हापूरचा विशाल पिंजानी ठरला यंदाचा 'मिस्टर गे इंडिया'; दक्षिण आफ्रिकेतील जागतिक स्पर्धेसाठी निवड

मानवेंद्र सिंह गोहिल यांच्या हस्ते विशालला ‘मिस्टर गे इंडिया’चा किताब प्रदान करण्यात आला.
Kolhapur Vishal Pinjani wins Mr. Gay India Contest
Kolhapur Vishal Pinjani wins Mr. Gay India Contestesakal
Updated on
Summary

परीक्षकांचे गुण आणि स्पर्धकाला आयोजकांच्या वेबसाईटद्वारे लोकांनी दिलेली मते विचारात घेऊन अंतिम निकाल दिला गेला.

कोल्हापूर : मिस्टर गे इंडिया आणि मिस्ट एलजीबीटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ‘मिस्टर गे इंडिया’ या स्पर्धेच्या (Mr. Gay India Contest) अंतिम फेरीत कोल्हापूरच्या विशाल पिंजानी (Vishal Pinjani) याने मोहोर उमटवली. काल पुण्यात झालेल्या रंगारंग सोहळ्यात ही निवड झाली.

Kolhapur Vishal Pinjani wins Mr. Gay India Contest
विषारी समजणाऱ्या रुईच्या झाडापासून बनवलं 'या' आजारावर औषध; प्रा. सुमेधा बनेंना मिळालं भारत सरकारकडून 'पेटंट'

दक्षिण आफ्रिकेतील (South Africa) केपटाऊन येथे होणाऱ्या जागतिक स्पर्धेसाठी आता तो भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे. कोल्हापूर आणि परिसरात ‘एलजीबीटीक्युआयएप्लस'' समुदायासाठी ‘अभिमान’ या स्वयंसहाय्यता गटाद्वारे विशाल काम करतो.

Kolhapur Vishal Pinjani wins Mr. Gay India Contest
धमक असेल तर हिंदू धर्म संपवण्याची भाषा करणाऱ्यांसोबतची आघाडी तोडून दाखवा; बावनकुळेंचं शरद पवारांसह ठाकरे, पटोलेंना चॅलेंज

अंतिम सोहळ्यात समलिंगी पुरुषांच्या सामाजिक - सांस्कृतिक संघर्षाला सामोरे जात आत्मविश्वासपूर्वक घडवलेल्या व्यक्तिमत्त्वाचे मोहक रूप, सहानुभाव, सर्वसमावेशकता याचे अनोखे दर्शन त्याने घडवले. समलिंगी पुरुषांसाठी आयोजित केलेल्या या स्पर्धेत शारीरिक तंदुरुस्ती, रुबाबदार व्यक्तिमत्व, बुद्धिमत्ता, हजरजबाबीपणा यासोबतच एलजीबीटीक्युआयएप्लस समुदायासाठी केलेले सामाजिक कार्य हे निवडीचे निकष होते.

Kolhapur Vishal Pinjani wins Mr. Gay India Contest
Hasan Mushrif : मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यात 'त्या' माणसाची अडचण असेल, तर माझा नाईलाज आहे; मुश्रीफांचा कोणावर रोख?

परीक्षकांचे गुण आणि स्पर्धकाला आयोजकांच्या वेबसाईटद्वारे लोकांनी दिलेली मते विचारात घेऊन अंतिम निकाल दिला गेला. राजपिपळा संस्थानाचे राजपुत्र आणि स्वतः समलिंगी असल्याचे जाहीरपणे मान्य करणारे मानवेंद्र सिंह गोहिल यांच्या हस्ते विशालला ‘मिस्टर गे इंडिया’चा किताब प्रदान करण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()