कोलकत्त्याच्या महिला डॉक्टरवर (Kolkata Doctor Rape Murder) झालेल्या अत्याचारासह हिंदूंचा अवमान होईल, असे कोणी वक्तव्य केल्यास ते खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे.
कोल्हापूर : सकल हिंदू समाजातर्फे (Hindu Community) आज (ता. २३) कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळी नऊ वाजता हिंदुत्ववादी संघटनांतर्फे महाआरती होईल. सकाळी दहा ते सायंकाळी पाचपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता अन्य घटकांनी व्यवहार बंद ठेवावेत, असे आवाहन संघटनांनी केले आहे.