Jayant Patil : केंद्र सरकारच्या 'या' नव्या नियमांमुळे कामगार वर्गात अस्वस्थता; जयंत पाटलांचा थेट आरोप

केंद्र सरकारने (Central Government) केलेल्या कामगारांच्या नव्या नियमांमुळे (Labour Law) कामगारांत अस्वस्थतता निर्माण झाली आहे.
Jayant Patil
Jayant Patilesakal
Updated on
Summary

साखर क्षेत्रात आपणास टिकायचे असले तर नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे.

पन्हाळा : केंद्र सरकारने (Central Government) केलेल्या कामगारांच्या नव्या नियमांमुळे (Labour Law) कामगारांत अस्वस्थतता निर्माण झाली आहे. नवीन नियम कामगारांचे शोषण करत आहेत. या नियमांमुळे कामगार संघटनांचा दबदबा कमी होणार आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी व्यक्त केले.

ते पन्हाळ्यात महाराष्ट्र राज्य साखर कारखाना (Maharashtra State Sugar Factory) प्रतिनिधी मंडळाच्या वतीने आयोजित कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील होते.

पाटील पुढे म्हणाले, प्रत्येक सहकारी साखर कारखान्याने कामगारांची संख्या वाढवण्याऐवजी, कार्यरत असलेल्या कामगारांनाच जास्त पगार व सुखसोयी देण्यासाठी प्राधान्य दिले पाहिजे. येणाऱ्या मार्चनंतर कामगार संघटनेचा करार हा पगार वाढीचा व त्यांचे चांगले भविष्य घडवणारा असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Jayant Patil
Big News : 'वंचित'चे प्रमुख प्रकाश आंबेडकर 'इंडिया आघाडी'सोबत जाण्‍यास तयार; साताऱ्यात केली मोठी घोषणा
MLA Jayant Patil
MLA Jayant Patilesakal

कार्यक्रमाची सुरुवात जयंत पाटील व पी. आर. पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन करण्यात आली. यावेळी अध्यक्षस्थानावरुन साखर संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील म्हणाले, महाराष्ट्रातील ग्रामीण जनतेचा शेती हाच व्यवसाय आहे. या गोरगरीब जनतेला रोजगार मिळावा व शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती व्हावी म्हणूनच सहकारी साखर कारखान्याची उभारणी करण्यात आली आहे. साखर क्षेत्रात आपणास टिकायचे असले तर नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. जुन्या तंत्रज्ञानामुळे आपण स्पर्धेत टिकणार नाही.

Jayant Patil
Belgaum : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सुटणार? पंतप्रधान कार्यालयाचं थेट म. ए. समितीला पत्र; म्हणाले, बेळगाव सीमाप्रश्न..

स्वागत महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कामगार संघटनेचे सरचिटणीस शंकरराव भोसले यांनी केले. प्रास्ताविक संघटनेचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे यांनी तर उपाध्यक्ष नितीन बेनकर यांनी आभार मानले. यावेळी संघटनेचे कार्याध्यक्ष रावसाहेब पाटील, अविनाश आपटे, सरचिटणीस शंकरराव भोसले, सचिव संजय मोरबाळे आदींसह महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.