मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या खात्यावर गेल्या दोन दिवसांपासून जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये जमा झाले.
कोल्हापूर : ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे (ladki Bahin Yojana) तीन हजार रुपये बहिणींच्या खात्यात जमा झाले आहेत. ही तुम्हाला दिलेली भेट नसून आमचे कर्तव्य आहे. आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या कमळ, धनुष्यबाण आणि घड्याळ चिन्हासमोरील बटण दाबून सहकार्य करा,’ असे थेट आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी केले.