Jyotiba Dongar : जोतिबा डोंगरावरील गायमुख तलावाला गळती; भिंतीतून मोठ्या प्रमाणात पाझरत आहे पाणी

जोतिबा डोंगराच्या (Jyotiba Dongar) पायथ्याशी असणारा ‘पुष्करणी’ म्हणजे गायमुख तलाव.
Gaimukh Lake on Jyotiba Dongar
Gaimukh Lake on Jyotiba Dongaresakal
Updated on
Summary

गायमुख तलाव हा जोतिबा डोंगराचे वैभव आहे. प्रामुख्याने जोतिबा चैत्र यात्रेत भाविक, ग्रामस्थांना तहान भागण्याचे काम हा तलाव अनेक वर्षांपासून करत आहे.

जोतिबा डोंगर : जोतिबा डोंगराच्या (Jyotiba Dongar) पायथ्याशी असणारा ‘पुष्करणी’ म्हणजे गायमुख तलाव. गायीच्या आकारासारखा तो दिसतो, म्हणून त्याला गोमुख किंवा गायमुख तलाव नाव पडले आहे. या तलावाच्या दक्षिण बाजूच्या भिंतीतून मोठ्या प्रमाणात पाणी पाझरून बाहेर पडत आहे.

गेल्या सत्तर वर्षांपासून चैत्र यात्रेसह जोतिबा ग्रामस्थांची हा तलाव तहान भागवत आहे. पण दिवसेंदिवस अतिवृष्टीमुळे हा तलाव कमकुवत होऊ लागला आहे. त्यामुळे या तलावाची तातडीने डागडुजी करणे आवश्‍यक आहे. सध्या हा गायमुख तलाव सध्या काठोकाठ भरला आहे. त्यामुळे तलावाच्या भिंतींवर दाब येऊन भिंती पाझरतात.

Gaimukh Lake on Jyotiba Dongar
महाराष्ट्र सरकारच्या विनंतीनंतर कर्नाटकच्या 'आलमट्टी'तून विक्रमी साडेतीन लाख क्युसेक विसर्ग; पुराचा धोका टळण्याची शक्यता?

केर्ली (ता. करवीर) येथील कासारी नदीतून थेट पाणी पाईपलाईनद्वारे गायमुख तलावात पाणी सोडले आहे. तसेच या तलावात भरपूर जिवंत झरेही आहेत. तेथून ते पाणी पंपाच्या सहाय्याने डोंगरावर असणाऱ्या पाण्याच्या टाकीत सोडले आहे. तिथूनच ते शुद्ध होऊन सायफन पद्धतीने संपूर्ण गावात नळाद्वारे जाते.

Gaimukh Lake on Jyotiba Dongar
Jyotiba Dongar : जोतिबा डोंगराच्या पायथ्याशी आढळले दीड टनाचे प्राचीन दगडी पर्जन्यमापक यंत्र

गायमुख तलाव हा जोतिबा डोंगराचे वैभव आहे. प्रामुख्याने जोतिबा चैत्र यात्रेत भाविक, ग्रामस्थांना तहान भागण्याचे काम हा तलाव अनेक वर्षांपासून करत आहे. तलावाच्या भिंतीची तातडीने दुरुस्ती करणे आवश्‍यक आहे.

-शिवाजीराव सांगळे, उपसरपंच, जोतिबा डोंगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.