Kolhapur: पन्हाळ्यावरून कुटुंबासह परतणाऱ्या पर्यटकांना रात्री साडेआठच्या सुमारास पन्हाळागडाच्या मुख्य रस्त्यावर जकात नाका ते बुधवार पेठेदरम्यान असलेल्या छोट्या घाट रस्त्यावरून वीर शिवा काशीद समाधीच्या बाजूला जाणाऱ्या बिबट्याचे दर्शन झाले.
पाऊस व दाट धुक्यात हरवलेला पन्हाळगड पाहण्यासाठी नेहमीच गर्दी होते. त्यामध्ये कुटुंबासोबत येणाऱ्या पर्यटकांची संख्या जास्त असते. सोमवारीही असेच कुटुंबासह पन्हाळा दर्शन करून व येथील जेवणाचा आस्वाद घेऊन परतणाऱ्या एका पर्यटक कुटुंब मुख्य रस्त्याने परतत होते.
जकात नाक्यापासून खाली जात असताना रस्त्यावरून दौडत जाणारा पूर्ण वाढ झालेल्या बिबट्याचे दर्शन झाले. हा प्रसंग त्यांनी कॅमेराबद्द करून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला.
त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली होती. याबाबत वनविभागाकडे विचारणा केली असता, वनविभागाने मुख्य रस्त्यावरील बाजूस असलेल्या रेडेघाटी परिसरात बिबट्याचे वास्तव्य आहे. तेथील बिबट्या नेहमीच खाद्याच्या शोधात मुख्य रस्ता ओलांडून गडाच्या पायाथ्याशी असलेल्या गावांच्या दिशेने जातो. त्याठिकाणी राहणाऱ्या या बिबट्याचा तो नेहमीचा मार्ग आहे, असे सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.