Shriram Mandir : निपाणीतील श्रीराम मंदिर उडवून देण्याची धमकी; दोन निनावी पत्रांनी खळबळ, मंदिरात कडेकोट पोलिस बंदोबस्त

मंदिराच्या गाभाऱ्याजवळ निनावी पत्र आढळून आले. त्यानंतर हनुमान मंदिराजवळ दुसरे पत्र आढळून आले आहे.
Shriram Temple Nipani Chikkodi Police
Shriram Temple Nipani Chikkodi Policeesakal
Updated on
Summary

श्रीराम मंदिर ट्रस्टने दोन्हीही पत्रे निपाणी शहर पोलिस ठाण्याच्या उपनिरीक्षक उमादेवी यांच्याकडे सुपूर्द केली आहेत.

निपाणी : येथील जुन्या पी. बी. रोडवरील श्रीराम मंदिर (Shri Ram Temple) उडवून देणाऱ्या धमकीचे निनावी पत्र मंदिरात मिळाले आहे. याबाबत निपाणी शहर पोलिस ठाण्यात (Nipani City Police Station) फिर्याद नोंद केली असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष आनंद सोलापूरकर (Anand Solapurkar) यांनी दिली आहे.

त्यानुसार चिक्कोडीचे पोलिस (Chikkodi Police) उपाधीक्षक गोपाळकृष्ण गौडर, निपाणीचे मंडल पोलिस निरीक्षक बी. एस. तळवार व सहकाऱ्यांनी शनिवारी (ता. ९) सायंकाळी राम मंदिराला भेट दिली. नागरिकांनी घाबरून न जाण्याचे आवाहन त्यांनी केले.

Shriram Temple Nipani Chikkodi Police
देशाला कायमचं कर्जात बुडवून मोदी एक दिवस संन्यासाला जातील; भाजप, काँग्रेससह पंतप्रधानांवर आंबेडकरांची सडकून टीका

शतकोत्तर परंपरा असलेल्या निपाणीतील श्रीराम मंदिरात २२ जानेवारी रोजी अयोध्या येथील रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच श्रीराम सेना हिंदुस्तानतर्फे शहरातून शोभायात्रा काढण्यात आली होती. त्यानंतर मंदिराच्या गाभाऱ्याजवळ निनावी पत्र आढळून आले. त्यानंतर हनुमान मंदिराजवळ दुसरे पत्र आढळून आले आहे.

Shriram Temple Nipani Chikkodi Police
सुडाचं आणि खूनशी राजकारण केलं जातंय, संविधानाला धक्का दिला तर लढाईच; विश्‍वंभर चौधरींचा भाजपला स्पष्ट इशारा

श्रीराम मंदिर ट्रस्टने दोन्हीही पत्रे निपाणी शहर पोलिस ठाण्याच्या उपनिरीक्षक उमादेवी यांच्याकडे सुपूर्द केली आहेत. पोलिसांच्या सूचनेनुसार राम मंदिर परिसरात सीसीटीव्ही लावण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.