लाखमोलाच्या ‘कोल्हापुरी’चे उत्पादन घटले; लाखाेंचा फटका

 Shubham Satpute from Subhash Nagar's obsession to preserve the original identity of Kolhapuri Chappal
Shubham Satpute from Subhash Nagar's obsession to preserve the original identity of Kolhapuri Chappal
Updated on

शिंगणापूर (कोल्हापुर): जगभरात प्रसिद्ध असलेल्या आणि दरवर्षी पर्यटनकाळात लाखो रुपयांची आर्थिक उलाढाल करणाऱ्या कोल्हापुरी चप्पलची (kolhapuri chappal) बाजारपेठ गेल्या दोन वर्षांपासून थंड आहे. कोरोनाचा (covid 19) संसर्गामुळे पर्यटनावरच बंदी आल्याने मागणीला वेसण बसली. दरवर्षी ५० लाख कोल्हापुरी जोड घडवणारे उत्पादन सध्या ४० टक्क्यांवर आले आहे. मागणी नाही आणि मागणी नाही म्हणून उत्पादनच नाही, या वास्तवाने लाखमोलाच्या कोल्हापुरी चप्पलला लॉकडाउनमुळे लाखांचा फटका बसला आहे.(lockdown-impact-cobblers-worried-production-stopped-kolhapuri-chappal-trending)

पर्यटनकाळात २० लाख पर्यटक तर वर्षभरात २५ ते ३० हजार स्थानिक लोक कोल्हापुरी चप्पलची खरेदी करतात. कारागिरांपासून ते चप्पल विक्रेत्यांपर्यंत हा पर्यटन काळ कोल्हापुरी चप्पलच्या आर्थिक उलाढालीसाठी सुगीचा काळ मानला जातो.वर्षाकाठी होणाऱ्या एकूण उत्पादनापैकी ८५ टक्के चप्पलची खरेदी ही पर्यटकांकडून केली जाते, तर दहा ते पंधरा टक्के ग्राहक हा स्थानिक नागरिक असतो. त्यामुळे कोल्हापुरी चप्पलची आर्थिक उलाढाल आणि त्यातून मिळणार उत्पन्न, हे पर्यटकांवर अवलंबून आहे. मात्र, कोरोना संकटात कोल्हापुरी चप्पलची बाजारपेठ पूर्णपणे होरपळली आहे. विक्री झाली नसल्यामुळे तो सगळा माल पडून राहिला आहे. ऑक्टोबरमध्ये काही प्रमाणात अनलॉक झालं आणि नाताळच्या सुटीत काही पर्यटक कोल्हापुरात आले होते. त्यांच्याकडून थोडी फार कोल्हापूर चप्पलची खरेदी झाली; मात्र त्यानंतर यावर्षीच्या फेब्रुवारीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कोल्हापुरी चप्पलची बाजारपेठ बंद झाली. मालाला उठाव नसल्याने कोल्हापुरी बनवणारे हात थांबले आहेत.

नवीन योजना कागदावरच

कोल्हापुरी चप्पल घडवण्यासाठी तब्बल बारा टप्प्यांमध्ये काम चालते. त्यामुळे ही चप्पल घडवणाऱ्या हातांच्या कौशल्याला योग्य मोल मिळावं यासाठी विविध स्तरावर कोल्हापुरी चप्पलला उभारी आणण्याकरिता प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये क्लस्टर योजना, जीआय मानांकन, ऑनलाइन मार्केट यासारख्या गोष्टी केल्या आहेत. परंतु, त्याबाबत असलेल्या निकषानुसार स्थानिक पातळीवर काम करण्यात अडचणी येत असल्यामुळे या नव्या योजना अद्याप कागदावरच आहेत.

वर्षभरात ग्राहकच नसल्याने उत्पादन घटले. आता उत्पादनच बंद आहे. कोल्हापुरी चप्पल खरेदी करण्यासाठी पावसाळा हा काळ अयोग्य आहे. पुढचे चार महिने अजूनही कोल्हापुरी चप्पल व्यवसायाला ग्राहकांची प्रतीक्षाच करावी लागणार आहे आणि याचा थेट फटका हा कोल्हापुरी चप्पल बनवणाऱ्या कारागिरांच्या उदरनिर्वाहावर होणार आहे.

-साईप्रसाद डोईफोडे, चप्पल व्यावसायिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.