कोल्हापूर : आम्ही दुकाने उघडणारे , गेले 81 व्या दुकाने बंद आहेत. आम्ही खायचे काय असं म्हणत कोल्हापूर महाद्वार रोड परिसरामध्ये मोठ्या संख्येने व्यापारी रोड वर आलेले आहेत. त्यामुळे व्यापारी आणि प्रशासन आमनेसामने आले आहेत. (lockdown-impact-mahadwar-road-area-merchants-aggressive-in-Kolhapur)
काल चेंबर ऑफ कॉमर्स तर्फे दुकान उघडण्याचा निर्णय घेण्यात आला होता.प्रशासनाने विरोध केला तर त्याला संघटितपणे सामोरे जाऊ अशी भूमिका चेंबर ऑफ कॉमर्स घेतली आहे . तर पालिका अधिकारी कारवाई करण्यावर ठाम आहेत.
आज सकाळपासूनच महाद्वार रोड परिसर मोठ्या संख्येने गजबजला आहे. सकाळी 9 ते संध्याकाळी 4 पर्यंत आम्ही सगळे दुकाने उघडणार. असा निर्धारच व्यापाऱ्यांनी केला आहे.आज आम्ही दुकाने उघडणारच. गेले 81 दिवस दुकाने बंद असल्यामुळे कपड्याची घडी उघडताच कपडे फाटू लागले आहेत. आम्हाला कोणत्या प्रकारची सवलत नाही. आम्हाला 25000 चे पॅकेज द्या .दुकान बंद करतो. या मतावर व्यापारी ठाम आहेत.मात्र अत्यावश्यक सेवा सोडून कोणतेही दुकान उघडले जाणार नाही.जर कोणी दुकान उघडेल तर त्यांच्यावर आम्ही कारवाई करू. या भूमिकेत पालिका अधिकारी ठाम आहेत.
गेली सव्वा दोन महिने बंद असलेले महाद्वार रोड वरील सर्व कापड दुकाने सकाळी दहाच्या सुमारास उघडण्यास सुरुवात झाली आहे. कोल्हापूर जिल्हा सराफ संघाच्या वतीने अध्यक्ष कुलदीप गायकवाड यांच्यासह व्यापार्यांनी महाद्वार रोड दुकाने अर्धशटर वर करून उघडण्याचे आव्हान रस्त्यावरून केले. त्यानुसार दुकानाच्या दारात थांबून राहिलेले कामगार आणि मालक यांनी दुकानाचे शटर उघडून साफसफाई सुरू केली आहे.
दुकाने उघडा आम्ही तुमच्या बरोबर आहे असे आव्हान अध्यक्ष गायकवाड यांनी केल्यामुळे द्विधा मनस्थिती असलेले व्यापाऱ्यांनी दुकाने उघडली. दरम्यानच्या काळात कारवाई करण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेचा अतिक्रमण विभागाचा ट्रक आणि पथक बिनखांबी गणेश मंदिर जवळ थांबून होता. या ठिकाणी काही पोलीस ही थांबून होते. बघता बघता एक एक दुकान उघडत गेले आणि राजारामपुरी महाद्वार रोड शहर परिसरातील दुकाने उघडण्यास सुरुवात झाली.
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये केवळ जीवनावश्यक आणि अत्यावश्यक दुकाने सकाळी सात ते दुपारी 4 पर्यंत सुरू करण्यास प्रशासनाने परवानगी दिली आहे. तरीही व्यापाऱ्यांचा उद्रेक होऊन त्यांनी आज स्वतःहून दुकाने उघडली आहेत. दरम्यान कारवाई करणार असल्याचा इशारा पोलीस अधीक्षक यांनी दिला आहे. त्यानुसार अकराच्या सुमारास जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्यासोबत व्यापार्यांची बैठक होत आहे. तेथे कारवाईबाबत पुढील निर्णय होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.