राशिवडे बुद्रुक : गेली 14 वर्षे त्याची बोटे सिंथेसाइजर आणि तबल्यावर लिलया फिरत होती. राज्यातल्या कानाकोपऱ्यात आणि नामवंत कलाकाराबरोबर त्याने साथ केली. संगीत क्षेत्रात नाव केलं. पण कोरोनामुळे लॉकडाउन सुरू झाला आणि त्याचे कार्यक्रम बंद झाले. तो घरातच आहे. याही परिस्थीतीत खचून न जाता उपजत गुणांना प्रोत्सहन दिले आणि हार्मोनियम दुरुस्तीचे आणि निर्मितीचे कौशल्य विकसित केले. त्याला लोकांचाही चांगली दाद मिळत आहे. तोच मुख्य व्यवसाय करण्याचा त्याने निर्णय घेतला आहे.
येळवडे ( ता. राधानगरी ) येथील शिवाजी सुतार यांची कोल्हापूर सह राज्यातील संगीतक्षेत्रात एक उत्कृष्ट सिंथेसायझर वादक म्हणून ओळख आहे. त्यांनी अवधूत गुप्ते, वैशाली सावंत, कार्तिकी गायकवाड अशा दिग्गजांच्या कार्यक्रमात त्यांनी साथ केली आहे. 14 वर्षे या क्षेत्रात तो रमला, सुरांमध्ये आपले सूर मिसळले. मात्र लॉकडाउन आणि कोरोनामुळे सारे ठप्प झाले आहे.
तेव्हा बालपणापासून घेतलेल्या सुतार शाळेतील कौशल्याबाबत विचार करू लागला. अशातच त्याच्या एका विद्यार्थ्याकडून हार्मोनियम म्हणजे सुरपेटी दुरुस्तीबाबत विचारणा झाली आणि अंधारात एक कवडसा सापडला.
एक पेटी दुरुस्त करून दिल्यानंतर मी सुरपेटीचे सूर निर्माण करू शकतो. हा आत्मविश्वास आला. त्याच बरोबर सुरपेटी दुरुस्त करणाऱ्या व्यक्तीकडून धडे घेतले, आज त्याचा उपयोग त्यांना होत आहे. गेल्या तीन महिन्यात पंधरा हार्मोनियम दुरुस्त करून दिल्या आहेत. तितक्याच घरात दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. नवीन बनविण्यासाठी चार पाच पेट्या आल्या आहेत. आधीच सुरांचे ज्ञान आणि सुरांमध्ये वाहून घेतलेला प्राण यामुळे शिवाजी सुतार यांना आज कोरोनाच्या काळातही एक नवी संधी चालून आली आहे. भविष्यात हीच संधी त्यांचे करिअर असेल, असे त्यांना वाटते.
"लॉकडाउन त्यानंतर हातचे काम गेले. आर्थिक मार्ग खुंटला. मात्र याच कोरोनाने मला नवी दिशा दाखवली आहे. गावातील घरात बसून मी सुरपेटी बनवतो आहे. उद्या हेच माझे भविष्य असेल असे दिसते.''
शिवाजी सुतार, सिंथेसाइजर कलाकार
-संपादन यशवंत केसरकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.