Rajesh Kshirsagar : लोकसभेसाठी कोल्हापूर-हातकणंगलेत धडाडणार मुख्यमंत्री शिंदेंची तोफ; 'या' दिवशी होणार मेळावे

मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत राज्यातील १६ लोकसभा मतदारसंघात मेळावे होणार आहेत.
Rajesh Kshirsagar Eknath Shinde
Rajesh Kshirsagar Eknath Shindeesakal
Updated on
Summary

उमेदवार कोण, मतदारसंघ कोणाला सोडणार, याबाबत सारख्या अफवा विरोधकांकडून परसवल्या जात आहेत.

कोल्हापूर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) अनुषंगाने शिवसेनेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत राज्यातील १६ लोकसभा मतदारसंघात मेळावे होणार आहेत. यामध्ये २९ जानेवारीला कोल्हापूर आणि ३० जानेवारीला हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मेळावे होणार आहेत, अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांनी येथे दिली.

ते म्हणाले, ‘‘मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर शिवसेनेतील मंत्री, वरिष्ठ पदाधिकारी यांची बैठक झाली. यात ‘शिवसंकल्प’ अभियानाद्वारे ६ जानेवारी २०२४ पासून राज्यभरात मेळावे घेण्याचे नियोजन करण्यात आले. तसेच व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे राज्यभरातील जिल्हाप्रमुख, शहरप्रमुख आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्याचा निर्णय झाला.

Rajesh Kshirsagar Eknath Shinde
कन्नड पाट्यांसाठी कर्नाटकात कन्नडिगांचा धुडगूस; बंगळुरात आंदोलनाला हिंसक वळण, इंग्रजी पाट्यांना फासलं काळं

बैठकीत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागा. पहिले पाऊल जाहीर होत आहे. कुठली जागा कुठला पक्ष लढवणार, उमेदवार कोण, मतदारसंघ कोणाला सोडणार, याबाबत सारख्या अफवा विरोधकांकडून परसवल्या जात आहेत.

Rajesh Kshirsagar Eknath Shinde
Udayanraje Bhosale : महापुरुषांच्या बदनामीविरोधात उदयनराजे आक्रमक; अमित शहांकडे केली 'या' कडक कायद्याची मागणी

यापुढेही पसरवल्या जातील. त्याकडे अजिबात लक्ष देऊ नका. आपण आपल्या सर्व जागा ताकदीने लढवूया, जिंकूया. आपली महायुती विजयी करुया. केलेल्या कामावर आपण मते मागूया, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले. त्याशिवाय शिवसंकल्प अभियानातील दौरे जाहीर केल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले.’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()