Satej Patil : पक्षात येण्याची हसन मुश्रीफांची ऑफर सतेज पाटील स्वीकारणार? काँग्रेस आमदारानं केला मोठा खुलासा

पक्षात येण्याची मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांची ऑफर असली तरीही मी महाविकास आघाडीतूनच लढणार आहे.
Hasan Mushrif Satej Patil
Hasan Mushrif Satej Patilesakal
Updated on
Summary

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मंत्री झाल्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा लवकर सुटेल, असे वाटत नाही.

कोल्हापूर : पक्षात येण्याची मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांची ऑफर असली तरीही मी महाविकास आघाडीतूनच लढणार आहे. लोकसभेसाठीही जिल्ह्यातील एक मतदारसंघ काँग्रेसला द्यावा, अशी आमची मागणी असल्याचे आमदार सतेज पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

जिल्ह्यातील नागरिक आणि कार्यकर्ते यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आयोजित भेटीगाठी कार्याक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. भागातील नागरी समस्यांसाठी निधी पाहिजे, शाळा-कॉलेजमध्ये प्रवेश दिला जात नाही, यासह अन्य वैयक्तिक समस्या घेऊन आज सुमारे पाचशेहून अधिक नागरिकांनी काँग्रेस कमिटीत हजेरी लावली होती.

Hasan Mushrif Satej Patil
पावसाचा जोर वाढला! कर्नाटकच्या आलमट्टीत 44 टीएमसी तर महाराष्ट्राच्या कोयना धरणात किती साठा?

सकाळी नऊ ते दुपारी दोनपर्यंत या सर्वांच्या समस्या आमदार पाटील यांनी जाणून घेतल्या. काहींच्या समस्या सोडविण्यासाठी तेथूनच संबंधित अधिकारी, प्राचार्य यांनाही थेट संपर्क केला. यावेळी काही कार्यकर्त्यांनीही त्यांच्या भागातील नागरी समस्यांबाबत गाऱ्हाणी मांडली. त्या सोडविण्यासाठी आवश्‍यक निधी देण्यासह संबंधित अधिकाऱ्यांनाही सूचना या भेटीगाठी कार्यक्रमातून देण्यात आल्या.

Hasan Mushrif Satej Patil
वाद चिघळणार! बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची स्वागत कमान पाडणाऱ्या दोषींवर होणार कारवाई; SC आयोगाचा इशारा

या कार्यक्रमानंतर आमदार पाटील यांनी पत्रकार परिषदेत जिल्हा आणि राज्यातील घडामोडींवर भाष्य केले. आमदार पाटील म्हणाले, ‘इतर पक्षांमध्ये फूट पडली असली तरीही काँग्रेस राज्यात आणि जिल्ह्यात एकसंध आहे आणि तो एकसंधच राहील. आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात मुंबईत बैठका सुरू आहेत, मात्र याचा निर्णय दिल्लीतच होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यातील दोन लोकसभा मतदारसंघांपैकी एक काँग्रेसला द्यावा, अशी आमची मागणी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मंत्री झाल्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा लवकर सुटेल, असे वाटत नाही. मंत्री होणार म्हणून गतवर्षी शिवलेली जॅकेट आता अनेकांना अपुरी पडत आहेत.’

Hasan Mushrif Satej Patil
राज्यात तीन पक्षांचं सरकार, आगामी निवडणुकांमध्ये जागा वाटपाचा पेच कसा सोडवणार? BJP आमदारानं दिलं स्पष्ट उत्तर

मणिपूरची घटना दडपण्याचा प्रयत्न

आमदार पाटील म्हणाले, ‘देशाचा अमृतमहोत्सव सुरू असताना मणिपूरसारखी घटना दडपण्याचा प्रयत्न झाला आहे. दीड महिन्यानंतर इंटरनेट सेवा सुरू झाल्यावर ही घटना सर्व जगासमोर आली आहे. स्थानिक मुख्यमंत्र्यांनी याबाबतचा अहवाल केंद्र शासनाला दिला होता का? दिला असला तरीही केंद्र शासन का गप्प बसले होते? केलेले पाप झाकण्याचा हा प्रयत्न आहे.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.