Loksabha Election : कोल्हापूरचा ग्राउंड रिपोर्ट थेट दिल्लीतून; प्रशांत किशोर-चाणक्य संस्थेकडून सर्व्हे, कोण मारणार बाजी?

देशात जे घडते त्याच्या काहीसे उलटे चित्र कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात असते.
Loksabha Election Kolhapur Prashant Kishor
Loksabha Election Kolhapur Prashant Kishoresakal
Updated on
Summary

राजनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) आणि चाणक्य संस्थेकडून हे सर्व्हे सुरू असल्याचे सांगून मतदारसंघाचा आणि उमेदवारांचा आढावा घेतला जात आहे.

कोल्हापूर : ‘कोल्हापूर’ आणि ‘हातकणंगले’ लोकसभा मतदारसंघातील (Kolhapur and Hatkanangale Loksabha Constituencies) उमेदवारी जाहीर करण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा कालावधी असतानाही थेट दिल्लीतून अजून सर्व्हेच सुरू आहेत. विद्यमान खासदारांना उमेदवारी दिली तर ते विजयी होतील का? त्यांची जमेची आणि कमकुवत बाजू कोणती, महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) उमेदवार कोण असेल, कोल्हापूरकरांचा कौल कोणाकडे आहे, ‘महाविकास आघाडी’ की ‘महायुती’ ? असे संदर्भ या सर्व्हेतून पुढे येत आहेत.

देशात जे घडते त्याच्या काहीसे उलटे चित्र कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात असते. येथे लाट वगैरे काही नसते. येथे कोल्हापूरकरांनी ठरविले तेच होते. त्यामुळे जिल्ह्यातील दोन्ही जागांसाठी उमेदवारी कोणाला द्यावी, विद्यमान खासदारांना दिल्यास दगाफटका होईल की त्यांना पुन्हा एकदा संधी दिली जाईल, याचा अंदाज खुद्द नेत्यांनाही लागत नसल्याची आजची स्थिती आहे. त्यातून वेगवेगळी माहिती पुढे येत आहे. प्रत्यक्षात मात्र जिल्ह्यातील ग्राऊंड रिपोर्ट काय सांगतो, यासाठी दिल्लीतून वेगवगेळे सर्व्हे सुरू झाले आहेत.

Loksabha Election Kolhapur Prashant Kishor
Prakash Ambedkar : 'वंचित'च्या राज्यस्तरीय धोरणाची 'ती' यशस्वी लिटमस टेस्ट ठरली; आता पुन्हा तो परिणाम दिसणार?

राजनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) आणि चाणक्य संस्थेकडून हे सर्व्हे सुरू असल्याचे सांगून मतदारसंघाचा आणि उमेदवारांचा आढावा घेतला जात आहे. जिल्ह्यात दोन्ही जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार कोण यावर महायुतीचे उमेदवार विजयी होतील की नाही हे ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यात महाविकास आघाडीकडून श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांचे नाव आघाडीवर असेल, असे गृहीत धरले आहे.

Loksabha Election Kolhapur Prashant Kishor
Loksabha Election : शिवसेनेचा 'चंद्रहार' कोणाच्या गळ्यात? 'कोल्हापूर' काँग्रेसला सोडण्याच्या बदल्यात 'सांगली'ची दिली आहुती!

तर हातकणंगलेतून माजी खासदार राजू शेट्टी हेच अपक्ष म्हणून रिंगणातील मुख्य उमेदवार गृहित धरले जात आहेत. खासदार धैर्यशील माने आणि खासदार संजय मंडलिक हे विद्यमान असूनही अद्याप त्यांना ग्रीन सिग्नल मिळाल्याचे दिसत नाही, तरीही महायुतीचे उमेदवार तेच असतील, अशी त्यांची तयारी सुरू आहे.

रिपोर्टकार्डच्या आधारावर रणनीती

सर्व्हेतून सखोल अभ्यास करून केवळ उमेदवारी नव्हे तर विजय झाला पाहिजे, इथंपर्यंतची तयारी सुरू असल्याचे सांगण्यात येते. वेगवेगळ्या माध्यमांतून वेगवेगळ्या व्यक्तींशी संवाद साधला जात आहे. काहींना प्रत्यक्षात भेटून ही माहिती अर्थात ग्राउंड रिपोर्ट घेतला जात आहे. याच रिपोर्टकार्डच्या आधारावर जिल्ह्यातील ‘कोल्हापूर’ आणि ‘हातकणंगले’ या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील रणनीती आखली जात असल्याचे दिसते.

Loksabha Election Kolhapur Prashant Kishor
Sangli Politics : काँग्रेसमध्ये बंड होणार? विश्‍वजित कदम यांच्यावर मोठी भिस्त, संशय बळावल्याने घडामोडीकडं भाजपचं लक्ष

सर्व्हेमधून पडताळणी..

शिवसेना शिंदे गटात असलेले दोन्ही विद्यमान खासदार हे पूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील होते. तेव्हा त्यांनी भाजप आणि शिवसेना अशा युतीतून निवडणूक लढवली होती, मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना दोन्हीमध्येही फूट पडली आहे. या सर्वांची ताकद या दोन्ही उमेदवारांना मिळणार काय? यापूर्वी विद्यमान खासदार संजय मंडलिक यांना काँग्रेसकडून आमदार सतेज पाटील यांचा तगडा पाठिंबा होता. आता तो महाविकास आघाडीच्या उमेदवाराला असणार आहे. त्याचीही सर्व्हेमधून पडताळणी केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.