राज्यात काँग्रेसचे सरकार आल्यानंतर कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. राज्यात मुलींसह कुणालाही संरक्षण नाही.
चिक्कोडी : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) चिक्कोडी मतदारसंघातून (Chikkodi Constituency) चारजण इच्छुक आहेत. भाजपच्या जिल्हा आणि तालुका पदाधिकाऱ्यांकडून मते मागविण्यात येत आहेत. ही मते संकलित करून राज्यातील पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे पाठवण्यात येतील, असे भाजपचे प्रदेश प्रवक्ते आणि विधान परिषद सदस्य अश्वथनारायण (Ashwath Naraya) यांनी सांगितले.
येथील भाजप कार्यालयात शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अश्वथनारायण म्हणाले, खासदार अण्णासाहेब जोल्ले (Annasaheb Jolle), माजी खासदार रमेश कत्ती (Ramesh Katti), अमित प्रभाकर कोरे व चिक्कोडी जिल्हा भाजपचे माजी अध्यक्ष डॉ. राजेश नेर्ली हे चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत. कोणाला तिकीट द्यायचे, याबाबत पक्षाचे पदाधिकारी व जनतेकडून मते व लोकांचा अभिप्राय जाणून घेतला जात आहे.
अश्वथनारायण म्हणाले, राज्यात काँग्रेसचे सरकार आल्यानंतर कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. राज्यात मुलींसह कुणालाही संरक्षण नाही. राज्य सरकारने गॅरंटीबरोबरच विकासावर भर द्यावा. दुष्काळ व्यवस्थापनासह प्रत्येक कामात राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे.
केंद्र सरकारबद्दल अफवा पसरविण्यात येत आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडून गॅरंटी योजनेच्या नावाखाली लोकांची फसवणूक सुरु आहे. राज्यात काँग्रेस सरकारविरोधी लाट सुरू झाली आहे. त्यांच्या पक्षाच्या आमदारांनी सरकारविरोधातील ३० आमदारांच्या सह्या हायकमांडकडे पाठवल्या आहेत. आमदारांना अधिकार दिले जात नाहीत. विकासकामे होत नसल्याच्या तक्रारी पक्षाचे सदस्य करत आहेत. यावरून राज्य सरकार दिवाळखोरीच्या मार्गावर असल्याचे दिसून येते, असे ते म्हणाले. यावेळी भाजपचे चिक्कोडी जिल्हाध्यक्ष सतीश आप्पाजीगोळ, माजी जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश नेर्ली, संजय पाटील, अप्पासाहेब चौगला, दीपक पाटील, अभय मानवी, शिवानंद नविनाळे आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.