कोल्हापूर : केंद्र सरकारच्या ईएसआयसी(ESIC)रुग्णालयातर्फे कामगारांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या विविध योजना कोरोनाकाळातही (Covid19)लागू आहेत, त्याचा लाभ ईएसआयसीकडे नोंदणीकृत कामगार (Worker)व त्यांच्या कुटुंबाला घेता येतो. यात कोरोना संसर्ग झालेल्यांना उपचाराच्या खर्चापासून ते नोकरी (Job)गमवावी लागल्यास दोन वर्षाचा भत्ता मिळण्यापर्यंतच्या योजनांचा समावेश आहे.
lose your job allowance from ESI covid 19 update marathi news
कोविड- १९ महामारीच्या काळात कामगारांसाठी वैद्यकीय सेवा (Medical Services)आणि आराम देण्यासाठी ईएसआयसीतर्फे कामगार लाभार्थ्यांसाठी विविध योजनांचा लाभ दिला आहे. वैद्यकिय लाभ विमाकृत व्यक्तिला किंवा त्याच्या परिवारातील सदस्याला कोविड-१९ चा संसर्ग झाल्यास कोविड समर्पित रुग्णालय म्हणून जाहीर केलेल्या कोणत्याही ईएसआयसी, ईएसआयएस रुग्णालयात विनामूल्य वैद्यकीय सेवा मिळू शकते.
ईएसआय लाभार्थी त्यांच्या पात्रतेनुसार शिफारस पत्राशिवाय सलग्न हॉस्पिटलमधून आपत्कालीन व विना आपत्कालीन वैद्यकीय उपचार घेता येतात. विमाकृत व्यक्तिने किंवा त्याच्या परिवारातील सदस्याने कोविड १९ चा संसर्ग झाल्यामुळे कोणत्याही खासगी संस्थेत उपचार घेतल्यास त्या खर्चाची मागणी करता येते.नगद लाभ जर विमाधारक कोरोनाचा संसर्ग झाल्याने कामावर गैरहजर राहत असेल तर तो त्याच्या पात्रतेनुसार संबंधित कालावधीसाठी आजारपणाचा लाभ घेऊ शकतो. आजारपणाचा लाभ सरासरी दैनंदिन मजुरीच्या ७० टक्के दरानुसार ९१ दिवसांसाठी लाभ दिला जातो.
कोणताही विमाधारक व्यक्ती बेरोजगार झाल्यास, अटल विमा कल्याण योजनेंतर्गत (एबीव्हीकेवाय) जास्तीत जास्त ९० दिवसांसाठी दिवसाच्या कमाईच्या सरासरीच्या ५० टक्के दराने सवलतीचा फायदा घेऊ शकतो. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी विमाधारक व्यक्ती www.esic.in वर आपला दावा ऑनलाईन दाखल करता येतो.
असे मिळतात लाभ
विमाधारक व्यक्ती आयडी ऍक्ट, १९४७ नुसार नोकर कपात झाल्यामुळे किंवा कारखाना, आस्थापना बंद झाल्यामुळे बेरोजगार झाल्यास, आरजीएसकेवाय अंतर्गत पात्रता अटींच्या आधारे तो दोन वर्षांच्या कालावधीसाठी बेरोजगारी भत्ता मागता येतो. कोणत्याही विमाधारकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास, अंत्यसंस्कार खर्चासाठी १५००० रुपये त्याच्या कुटुंबातील ज्येष्ठ हयात असलेल्या सदस्यास दिले जातात.
lose your job allowance from ESI covid 19 update marathi news
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.