Lost Dog Maharaj : पांडुरंगानेच दाखवली वाट... वारीत हरवलेला 'महाराज' २५० किमीचा प्रवास करून परतला घरी; गावाने काढली मिरवणूक

Lost dog maharaj travels 250 km to return home : कर्नाटकातील यमगर्णी गावच्या गावकऱ्यांनी चक्क या कुत्र्याची मिरवणुक काढत त्याच्या सन्मानात मेजवाणी देखील दिली आहे, पण यामगील कारण देखील तेवढंच खास आहे.
Lost dog maharaj travels 250 km to return home
Lost dog maharaj travels 250 km to return home
Updated on

आषाढी एकादशीला मराठी माणसांच्या हृदयात एक वेगळ स्थान आहे. या एकादशीला पांडुरंगाच्या दर्शनासाठी राज्यभरातून लाखो वारकरी पायी पंढरपुरात दाखल होतात. पण यंदाच्या वारीत एका श्वानाने देखील वारी पूर्ण केली. हे श्वान वारीहून परतल्यानंतर बेळगाव जिल्ह्यातील निपाणी तालुक्यातील यमगर्णी गावात एक वेगळेच दृश्य पाहायला मिळाले. यमगर्णी गावच्या गावकऱ्यांनी चक्क या कुत्र्याची मिरवणूक काढत त्याच्या सन्मानात मेजवाणी देखील दिली.

त्यांचे झाले असे की, महाराज नावाचा कुत्रा, पंढरपूरच्या वारीमध्ये हरवला होता. पण काही दिवसांनंतर सुमारे 250 किमी प्रवास करून तो स्वतः आपल्या गावी परत आला. त्याला पुन्हा गावात बघून गावकऱ्यांनी एकच आंनदोत्सव केला.

जून महिन्यात 'महाराज' हा त्याचे मालक कमलेश कुंभार यांच्या मागेमागे पायी वारीत गेला होता. जूनच्या शेवटच्या आठवड्यात महाराज पंढरपूरची दरवर्षीच्या ठरलेल्या वारीसाठी गेले होते. ते दरवर्षी आषाढ एकादशी आणि कार्तिकी एकादशीला पंढरपूरला जातात. यावेळी मात्र त्यांच्या पायी प्रवासात महाराज नावाच्या कुत्र्यानेही साथ दिली.

मालकासोबत सुमारे 250 किमीचा हा प्रवास कुत्र्याने केला. पण कुंभार यांनी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात दर्शन घेतल्यानंतर त्यांचा हा कुत्रा गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. जेव्हा ते कुत्र्याला शोधू लागले तेव्हा तेथील लोकांनी त्यांना सांगितले की कुत्रा दुसऱ्या गटासह निघून गेला आहे.

कुंभार यांनी सांगितले की, मी तरीही त्याचा सर्वत्र शोध घेतला पण मला तो सापडला नाही. त्यामुळे, मला वाटले की कदाचित लोक खरं सांगत असतील, आणि तो दुसऱ्यासोबत निघून गेला असेल. मी 14 जुलैला माझ्या गावी परतलो.

पण अगदी काही दिवसांपूर्वी कुंभार यांना तेव्हा आश्चर्याचा धक्का बसला जेव्हा त्यांचा कुत्रा पुन्हा घरी परत आला. कुंभार यांनी सांगितलं की, एकादिवशी अचानक महाराज माझ्या घरासमोर उभा होता, शेपूट असं हलवत होता जसं काही घडलंच नाही. त्याला चांगलं खायला मिळाल्याचंही दिसतं होतं.

Lost dog maharaj travels 250 km to return home
Eknath Shinde : "माझी हत्या झाली तरी चालेल, पण एकनाथ शिंदेंना सोडणार नाही", सेना आमदाराचा रोख कोणाकडे?

कुंभार यांनी सांगितलं की, महाराज परत आल्यानंतर त्यांनी आणि गावकऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला. कुत्रा घरापासून 250 किमी किंवा त्याहून अधिक अंतर दूर असूननही त्याला घराचा रस्ता सापडला हा एक चमत्कारच आहे. आम्हाला वाटते की त्याला पांडुरंगानेच रस्ता दाखवला असेल.

हरवलेला कुत्रा घरी परत आल्यानंतर कुंभार कुटुंबीयांच्या आनंदाला पारावर उरला नाही. त्यांच्यासोबत गावकऱ्यांनीही महाराजची गावातून जंगी मिरवणूक काढली. तसेच त्याला हार घालून पूजन केले. महाराजचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

Lost dog maharaj travels 250 km to return home
Uran Murder Case : मोहसीनचा संबंध नाही? यशश्री शिंदे खून प्रकरणातील अनुत्तरित प्रश्नांचा पोलिसांनी केला उलगडा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.