कोल्हापूर ः म्हालसवडे (ता. करवीर) येथील मंडळाने स्पीकर लावून जल्लोषात मिरवणूक काढल्याबद्दल करवीर पोलिस ठाण्यात पंधरा कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. काल रात्री गणेश मूर्ती विसर्जन मिरवणूक काढली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विसर्जन मिरवणूक काढण्यास बंदीच्या नियमाचा भंग केल्यामुळे ही कारवाई केली. जयहिंद तरुण मंडळाचे हे पदाधिकारी असल्याची माहिती करवीर पोलिसांनी दिली. पोलिस नाईक विलास जाधवर यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सांगितले, म्हालसवडे येथील किरण मधुकर पाटील, सचिन राजाराम पाटील, निलेश विलास कुंभार, विजय मधुकर निकम, शिवाजी गणपती निकम, उमेश विष्णू पाटील, संदीप सुभाष पाटील, सागर मारुती पाटील, सचिन शंकर पाटील, गौरव गोविंद पाटील, गोविंद वसंत पाटील, गणेश हिंदुराव पाटील, शुभम संभाजी पाटील, समीर तुकाराम पाटील, अनिकेत बळवंत पाटील (सर्व म्हालसवडे) यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम, कोविड उपाययोजना नियम रोग प्रतिबंधक कायदा कलमानुसार गुन्हे दाखल झाले आहेत.
कोविडच्या पार्श्वभूमीवर विसर्जन मिरवणूक काढण्यास मनाई असताना काल रात्री जयहिंद तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यानी वाहनावर स्पीकर बॉक्स लावून मोठ्याने गाजावाजा करीत जल्लोषात मिरवणूक काढली. हा प्रकार करवीर पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांवर कोरोनाचा संसर्ग वाढेल, असे जाणीवपूर्वक कृत्य केल्याबद्दल गुन्हा दाखल केला.
संपादन ः रंगराव हिर्डेकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.