Nipani : ..तर महाराष्ट्रातील नेत्यांना कर्नाटकात येण्यापासून रोखणार; पोलिसांची महत्वपूर्ण भूमिका, वाद चिघळणार?

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी बुधवारी (ता. ३०) सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी होणार आहे.
Karnataka-Maharashtra Police Meeting at Nipani
Karnataka-Maharashtra Police Meeting at Nipaniesakal
Updated on
Summary

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी बुधवारी (ता. ३०) सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी होणार आहे.

निपाणी : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी बुधवारी (ता. ३०) सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (ता. २९) सकाळी येथील शासकीय विश्रामधामात आंतरराज्य पोलिसांची (Police) बैठक झाली. त्यामध्ये सुनावणीनंतर कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी या बैठकीत आंतरराज्य पोलिसांची चर्चा झाली.

शिवाय, बुधवारी सर्वत्र कडेकोट बंदोबस्त राहणार आहे. तरीही सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याचे राज्याचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक आलोक कुमार यांनी स्पष्ट केले. सकाळी नऊ वाजता या आंतरराज बैठकीला सुरुवात झाली. कर्नाटक-महाराष्ट्रातील सीमावर्ती जिल्ह्यांमधील पोलिस अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.

Karnataka-Maharashtra Police Meeting at Nipani
Karnataka-Maharashtra Police Meeting at Nipani

अतिरिक्त पोलिस महासंचालक आलोक कुमार म्हणाले, चार दिवसांपूर्वी कर्नाटक-महाराष्ट्रात सीमाप्रश्नी (Maharashtra-Karnataka Border Dispute) विविध वक्तव्यावरून दोन्ही राज्यांमध्ये तणाव निर्माण झाला होता. यामध्ये बसेससह सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले. त्याची चौकशी सुरू असून दोषीवर कारवाई होणार आहे. बुधवारी सीमाप्रश्नावर सुनावणी होणार आहे. त्यात कोणता निकाल येईल, याची माहिती कोणालाच नाही. तरीही निकालानंतर कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये तणावाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर दोन्ही राज्यांच्या सीमेवर चोख बंदोबस्त ठेवला जाणार आहे. विशेषतः कोगनोळी, कागवाड, निपाणी, संकेश्वर या भागातील चेक पोस्टवर विशेष नजर राहणार आहे.

बेळगावात २९ डिसेंबरपासून विधानसभेचे अधिवेशन होणार आहे. या काळात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, म्हणूनच ही बैठक घेतली आहे. सध्या तरी कर्नाटक-महाराष्ट्र सीमाभागात १४४ कलम लागू करण्याची आवश्यकता नाही. बुधवारच्या परिस्थितीनंतर शाळा, महाविद्यालये, बससुविधा व इतर व्यवस्थेबाबत विचार करून निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे निर्णय काहीही झाला तरी नागरिकांनी कायदा हातात घेऊ नये. मंगळवारपासूनच सीमाभागात पोलिसांचे पेट्रोलिंग सुरू राहणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

आंतरराज्य बैठकीस उत्तर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक एन. सतीशकुमार, जिल्हा पोलिस प्रमुख डाॅ. संजीव पाटील, अतिरिक्त जिल्हा पोलिस प्रमुख महालिंग नंदगावी, पोलिस उपायुक्त रवींद्र गडादी, सिंधुदूर्ग विभागाच्या पोलिस प्रमुख डॉ. रोहिणी साळुंखे, चिक्कोडीचे पोलिस उपाधीक्षक बसवराज एलिगार, गोकाकचे पोलिस उपाधीक्षक मनोजकुमार नायक, एस. व्ही. गिरीश, निपाणीचे मंडल पोलिस निरीक्षक संगमेश शिवयोगी, बी. एस. तलवार, उपनिरीक्षक कृष्णवेणी गुर्लहोसुर यांच्यासह कर्नाटक-महाराष्ट्रातील पोलिस अधिकारी उपस्थित होते.

Karnataka-Maharashtra Police Meeting at Nipani
Naor Gilon : एक माणूस म्हणून मला लाज वाटतेय! 'कश्मीर फाईल्स'वरील टीकेवर इस्रायली राजदूतांनी मागितली माफी

...तर महाराष्ट्रातील नेतेमंडळींना रोखणार

महाराष्ट्रातील काही नेते मंडळींनी बेळगावात येणार असल्याचे ट्विटरवरून सांगितले आहे. ते वैयक्तिक अथवा नातेवाईकांच्या कार्यक्रमासाठी येत असतील तर आमचा विरोध नाही. पण सार्वजनिक कार्यक्रम अथवा कायदा व सुव्यवस्था बिघडेल, असे वक्तव्य करण्यासाठी येत असतील तर त्यांना वेळीच रोखले जाईल, असे अतिरिक्त पोलिस महासंचालक आलोक कुमार यांनी सांगितले.

Karnataka-Maharashtra Police Meeting at Nipani
TMC MLA : मी 'त्यांची' माफी का मागायची? मोदी-शहांना दुर्योधन-दुशासन म्हणणाऱ्या आमदार स्पष्टचं बोलल्या

कोल्हापूर पोलिस ऑनलाईनवर

आंतरराज्य बैठकीसाठी बेळगाव, कोल्हापूरसह महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांना निमंत्रण दिले होते. पण कोल्हापूर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी निपाणीला बैठकीस येण्यास टाळले. अखेर त्यांनी ऑनलाइनवरूनच बैठकीमध्ये सहभाग घेतला.

Karnataka-Maharashtra Police Meeting at Nipani
दुधाच्या प्लास्टिक पिशवीचा कापलेला छोटा कोपराही घडवेल अनर्थ...

शांततेने आंदोलन करणाऱ्यांनाच परवानगी

सीमाप्रश्नाबाबत कोणताही निर्णय झाला तरी विविध संघटना व नागरिकांनी संयम बाळगावा. याचिकेवरील सुनावणीनंतर शांततेने आंदोलन करणाऱ्यांनाच परवानगी दिली जाईल. अन्यथा सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान व समाजातील शांतता बिघडविणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणार असल्याचेही अतिरिक्त पोलिस महासंचालक आलोक कुमार यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.