ज्यावेळी उधारीवरील रक्कम परत केली जाते, त्यावेळी ग्राहकाकडून घेतलेले कोरे धनादेश संबंधित ग्राहकाला परत दिले जात होते.
कोल्हापूर : शेतकरी सहकारी संघाच्या (Farmer Cooperative Union) कार्वे (ता. चंदगड) येथील पेट्रोल पंपावर ग्राहकाने डिझेल उधारीवर घेतल्याचे पैसे दिले नाहीत, असे अधिकाऱ्याचे म्हणणे आहे, तर डिझेलचे पैसे रोखीने दिल्याचे ग्राहकाचे मत आहे. अधिकारी आणि ग्राहकांच्या वादात पाच ते साडेपाच लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले आहे.