Kolhapur : फार्महाऊसच्या नावाखाली रात्रंदिवस 'धिंगाणा'; नृत्यांगना आणण्यापर्यंत फार्महाऊस मालकांची मजल

Radhanagari Taluka Farmhouse : माळरान, गायरान क्षेत्रांत उभारलेल्या फार्महाऊसकडे ग्रामस्थ सहसा फिरकत नाहीत.
Radhanagari Taluka Farmhouse
Radhanagari Taluka Farmhouseesakal
Updated on
Summary

एका माजी नगरसेवकाच्या मुलाने स्वतःचा वाढदिवस ‘जंगी’ करण्याचे ठरवून गगनबावडा गाठले. सावकारीचे गुन्हे दाखल असलेल्या एकाचे फार्महाऊस यासाठी घेण्यात आले.

कोल्हापूर : गगनबावडा, शाहूवाडी, राधानगरी तालुक्यांतील धरणांचे पाणलोट क्षेत्र, लघु पाटबंधारे प्रकल्पांच्या (Irrigation Projects) काठाला ‘फार्महाऊसचा’ (Farmhouse) विळखा पडला आहे. वन्यप्राणी, पक्षी यांच्या अधिवासालाही धोका पोहोचविणारी बांधकामे नेमकी कोणाच्या कृपेने होतात, हा संशोधनाचा विषय बनला आहे. मोठ्या आवाजातील साऊंड सिस्टीम, जुगाराचे डाव सुरू असणाऱ्या काही फार्महाऊसमध्ये आता थेट नृत्यांगनाच नाचविण्याचे प्रकार सुरू झाले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.