कोल्हापूर : एक, दोन रुपयांच्या कोर्ट तिकिटांची सक्ती

१० रुपयांचे तिकीट मार्केटमधून गायब
Mandatory one two rupee court tickets Rs 10 ticket disappears market
Mandatory one two rupee court tickets Rs 10 ticket disappears marketsakal
Updated on

कोल्हापूर : दहा रुपयांचे कोर्ट तिकीट महिन्याभरापासून मार्केटमधून गायब आहे. त्या बदल्यात एक, दोन रुपयांचीच तिकिटे घेण्याची सक्ती केली होती. काही उप स्टॅम्प होल्डरांकडून तर दहा रुपयांचे हेच तिकीट थेट बारा रुपयांना विक्री केले जात आहे. विशेष करून सरकारी कार्यालयांच्या परिसरात ही स्थिती आहे. दोन रुपयांची तिकिटे घेण्यासाठी कोषागार कार्यालयातूनच सक्ती केल्याचे सांगण्यात आले. ही दोन्ही तिकिटे बंद होणार असल्यामुळे ती खपविण्यासाठी ही सक्ती केली जात असल्याचेही सांगण्यात आले.

Mandatory one two rupee court tickets Rs 10 ticket disappears market
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांना श्रद्धांजली

न्यायालयीन कामकाज असो किंवा सरकार दरबारी एखादा अर्ज करताना दहा रुपयांचे कोर्ट तिकीट लावणे आवश्‍यक असते. पूर्वी यासाठी शंभर रुपयांचा स्टॅम्प (मुद्रांक) आवश्‍यक होता. मात्र अलीकडे कोर्ट तिकीट लावले तरीही तो कागद ग्राह्य मानला जात असल्यामुळे दहा रुपयांच्या कोर्ट तिकिटाला अधिक मागणी आहे. तरीही हेच तिकीट गायब झाल्यामुळे ग्राहकांची एकच कोंडी झाली.

८० लाखांची कोर्ट तिकिटे शिल्लक असल्यामुळे ती खपविण्यासाठी प्रत्येक तालुक्यांना एक आणि दोन रुपयांची तिकिटे दिली आहेत. ती संपविण्यासाठी सक्ती केली होती. कालपासून दहा रुपयांची तिकिटे दिली आहेत. आता दोन आणि पाच, दहा रुपयांची तिकिटे देण्यास स्टॅम्प होल्डरांना सांगितले आहे. एक, दोन रुपयांची तिकिटे बंद झाल्यास ती पडून राहणार म्हणून ही सक्ती होती.

-विद्या महाजन, उपलेखापाल, कोषागार कार्यालय

Mandatory one two rupee court tickets Rs 10 ticket disappears market
राज्यात कोरोना मृतांचा आलेख वाढला; दिवसभरात १८०६७ नव्या रुग्णांची भर

तक्रार आल्यास जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवू

काही ठिकाणी जादा दराने तिकिटांची विक्री होत असल्याबाबत एकही तक्रार नाही. वेळेचा विचार करून ग्राहकच तक्रार करीत नाही. त्यामुळे कारवाईचा प्रश्‍नच येत नाही. तक्रार आल्यास जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवू, असे महाजन म्हणाल्या.

दृष्टिक्षेपात...

  • अधिकृत विक्री- १२ तालुक्यांत १२ ठिकाणांतून

  • शहरातील स्टॅम्प होल्डर - ६७

  • जिल्ह्यातील स्टॅम्प होल्डर- ४५०

  • प्रती महिना विक्री- सुमारे ३२ लाख रुपयांची

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.